Join us  

शिक्षक भरतीच्या मुलाखतींचे व्हिडीओ रेकॉर्डिंग बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 8:25 AM

राज्यातील शिक्षकांची भरती गुणवत्तेच्या आधारावर करण्यासाठी राज्य शासनाकडून पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले.

पुणे : राज्यातील शिक्षकांची भरती गुणवत्तेच्या आधारावर करण्यासाठी राज्य शासनाकडून पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले. पोर्टलमार्फत खासगी संस्थांच्या अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या एका जागेसाठी ५ उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे. या उमेदवारांची मुलाखत घेऊन निवड संस्थाचालकांना करता येणार आहे. मात्र, या मुलाखतींचे व्हिडीओ चित्रीकरण करणे त्या संस्थांवर बंधनकारक असेल, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ विनोद तावडे यांच्या हस्ते गुरुवारी झाला. तातडीने प्राध्यापक भरतीसाठी ३०० पॅनल तयार ठेवण्याच्या सूचना विद्यापीठांना दिल्याची माहिती त्यांनी दिली. भरतीसाठी महाराष्ट्राने राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या अभियोग्यता व बुद्धीमापन चाचणीत उत्तीर्ण झालेल्या १ लाख २१ हजार ६१५ उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी केली आहे. यातील १ लाख ८ हजार ४६४ उमेदवार शिक्षक भरतीसाठी पात्र ठरले आहेत.राज्यपालांद्वारे चौकशीराज्यातील ६ विद्यापीठांमध्ये पदनाम बदलून वेतनश्रेणीमध्ये वाढ करण्याचा प्रकार घडला. यामध्ये विद्यापीठस्तरावरील जे तत्कालीन कुलगुरू, कुलसचिव व इतर पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता का याची चौकशी राज्यपालांमार्फत होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

टॅग्स :विनोद तावडेमुंबई