नवी मुंबईत बंदला संमिश्र प्रतिसाद

By Admin | Updated: February 23, 2015 01:00 IST2015-02-23T01:00:06+5:302015-02-23T01:00:06+5:30

कामगार नेते गोविंद पानसरेंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला नवी मुंबईमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. वाशी, ऐरोली,

Composite response to Navi Mumbai | नवी मुंबईत बंदला संमिश्र प्रतिसाद

नवी मुंबईत बंदला संमिश्र प्रतिसाद

पनवेल : कामगार नेते गोविंद पानसरेंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला नवी मुंबईमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. वाशी, ऐरोली, कोपरखैरणे, पनवेल आदी मोठ्या शहरांमधील काही ठिकाणी या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. रविवार सुटीचा दिवस असल्यामुळे देखील या शहरांमध्ये शुकशुकाट पाहावयास मिळाला.
पनवेलमध्ये अंनिस शाखा व पुरोगामी शाखांच्या वतीने शहरात निषेध रॅली काढण्यात आली होती.
या रॅलीत घरकामगार महिला, वंचित कामगार, अंधश्रद्धा निर्मूलन लढ्यातील कार्यकर्ते सहभागी
झाले होते. ही निषेध रॅली पनवेलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पनवेल बस
स्थानक, आदर्श हॉटेल, जुने तहसील, शिवाजी अश्वारूढ पुतळ्यापर्यंत काढण्यात आली होती. पनवेलमध्ये काही काळ धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. त्यामध्ये प्रदीप पाटकर, पी.बी. हांडे , पी.एल. गायकवाड, संजय बेडदे , अ‍ॅड. आर.के.पाटील, प्रभाकर कांबळे, मानवेंद्र वैदू, मंदाकिनी हांडे, रामदास धोत्रे, आर.एन.वानखेडे, एन.सी.गवई, प्रियंका हांडे ,नॅन्सी गायकवाड आदींसह शेकडो कार्यकर्ते व पुरोगामी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरेंचे छायाचित्र लावलेले फलक फडकविण्यात आले.
आंदोलनकर्ते पी.बी. हांडे यांनी सांगितले की, डॉ.नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या खुनाबद्दल लोकांमध्ये तीव्र संताप असल्याचे सगळीकडे सुरू असलेल्या विरोधामुळे दिसून येत आहे. पोलिसांनी व शासनाने हा तपास लवकर करावा, अन्यथा मोठे जनआंदोलन उभे राहील. (प्रतिनिधी)

Web Title: Composite response to Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.