मुंबई : पावसाळ्यापूर्वी विविध प्राधिकरणांनी त्यांच्या जागेतील होर्डिंगचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने लागू केलेल्या होर्डिंग धोरणानुसार सर्व होर्डिंग नियम पळत असल्याची खातरजमा करण्याचे आदेश त्यांनी दिले. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा संदर्भ देत होर्डिंग ज्या खांबांवर उभे करण्यात आले आहे, त्या खांबांचीदेखील तपासणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे सह सर्व संबंधित यंत्रणांना दिले.
येत्या पावसाळ्याच्या अनुषंगाने, शहर व उपनगरातील यंत्रणांमध्ये चोख समन्वय राहावा, या दृष्टीने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांची बैठक पालिका मुख्यालयात मंगळवारी पार पडली. यावेळी प्रामुख्याने मध्य व पश्चिम रेल्वे, मेट्रो आणि मोनो रेल्वे, भारतीय हवामान विभाग, भारतीय तटरक्षक दल, नौसेना, एनडीआरएफ, मुंबई पोलिस, म्हाडा, पीडब्ल्यूडी, एमएमआरडीए, बेस्ट इत्यादी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यंदाच्या पावसाळ्यात पाण्याचा निचरा अधिकाधिक जलद गतीने व्हावा, यासाठी पालिकेच्या संबंधित खात्यांबरोबर आणि विभागांसोबत सर्व यंत्रणांनी समन्वय साधण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
सोबतच मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे इत्यादींच्या हद्दीत करण्यात येणाऱ्या कामांबाबत नियमित समन्वय साधत प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे ही त्यांनी नमूद केले. मेट्रो प्रशासनाने देखील पाणी उपसा करणारे पंप बसवताना प्रत्येक मेट्रो स्थानकाची भौगोलिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन तशा क्षमतेचे पंप बसवावेत, असेही आयुक्तांनी बैठकीत सांगितले.
पुरेसा वेळ मिळायला हवा
१. सर्व धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण हे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून, धोकादायक इमारतींबाबत तेथील रहिवाशांचे स्थलांतर आवश्यक आहे, अशा प्रकरणी सुनिश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार अर्थात ‘एसओपी’नुसार कार्यवाही करावी, असे गगराणी यांनी नमूद केले. २. भारतीय हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवताना व त्याबाबत सूचना देताना संबंधित यंत्रणांना त्यांच्या स्तरावरील कार्यवाही करण्यास पुरेसा वेळ मिळायला हवा, ही बाब लक्षात घेऊन पूर्व सूचना देणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.
नियोजनाची माहिती
बैठकीच्या सुरुवातीला आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी पावसाळ्याच्या अनुषंगाने आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती उपस्थितांना संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.
पावसाळ्यादरम्यानच्या साथरोगांची संभाव्यता लक्षात घेऊन करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघडे यांनी दिली.
Web Summary : Commissioner Gagrani directed authorities to survey hoardings before monsoon, ensuring compliance with regulations after the Ghatkopar incident. He emphasized structural checks of hoarding supports and coordinated efforts between agencies like railways and the weather department for effective disaster management and minimal public inconvenience. Focus on timely warnings and SOP adherence for building evacuations.
Web Summary : आयुक्त गगरानी ने घाटकोपर घटना के बाद बारिश से पहले होर्डिंग का सर्वेक्षण करने का निर्देश दिया। उन्होंने होर्डिंग के खंभों की जांच और आपदा प्रबंधन के लिए रेलवे जैसे विभागों के बीच समन्वय पर जोर दिया। इमारतों को खाली कराने के लिए समय पर चेतावनी और एसओपी का पालन सुनिश्चित किया जाए।