वाशी येथे वृक्षतोडीची तक्रार

By Admin | Updated: July 2, 2014 00:53 IST2014-07-02T00:53:56+5:302014-07-02T00:53:56+5:30

सायन - पनवेल मार्गाच्या रुंदीकरण दरम्यान वाशी येथे वृक्षतोड केल्याबद्दल स्थानिक नागरिकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Complaint of tree trunk at Vashi | वाशी येथे वृक्षतोडीची तक्रार

वाशी येथे वृक्षतोडीची तक्रार

नवी मुंबई : सायन - पनवेल मार्गाच्या रुंदीकरण दरम्यान वाशी येथे वृक्षतोड केल्याबद्दल स्थानिक नागरिकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कोणतीही कल्पना न देताच वृक्षतोड केल्याने त्यांनी जे. कुमार या कंपनीविरोधात तक्रार केली आहे.
सायन-पनवेल मार्गाचे रुंदीकरण काम सुरू असून या कामात अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची तोड केली जात आहे. त्याप्रमाणे वाशी येथील ७ वृक्षांवर जे. कुमार या कंपनीने घाव घातलेला आहे. परंतु ही वृक्षतोड करताना जे. कुमार कंपनीने आपल्याला कल्पना दिली नसल्याचे त्या वृक्षांचे संवर्धन करणारे राजेश सुतार यांचे म्हणणे आहे. गेली कित्येक वर्षे आपण या वृक्षांचे जतन करत असताना त्या वृक्षांची तोड करण्यापूर्वी आपली अनुमती आवश्यक होती असे त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Complaint of tree trunk at Vashi