प्रफुल्ल कांबळेविरोधात ठाण्यातही गुन्हा दाखल
By Admin | Updated: January 10, 2015 02:12 IST2015-01-10T02:12:57+5:302015-01-10T02:12:57+5:30
शिधावाटप केंद्रचालकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेल्या प्रफुल्ल कांबळे या तथाकथित संपादकाविरोधात ठाण्यातही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे.

प्रफुल्ल कांबळेविरोधात ठाण्यातही गुन्हा दाखल
मुंबई : शिधावाटप केंद्रचालकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेल्या प्रफुल्ल कांबळे या तथाकथित संपादकाविरोधात ठाण्यातही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्याच्या साथीदारांविरोधात श्रीनगर पोलिसांनी खंडणीचा स्वतंत्र गुन्हा नोंदविला आहे.
‘युवा प्रभाव’ या साप्ताहिकाचा संपादक म्हणून ओळख सांगणाऱ्या आणि राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या कांबळेला ६ जानेवारीला गुन्हे शाखेच्या घाटकोपर कक्षाने मुलुंड कॉलनीतून गजाआड केले होते. सोबत या साप्ताहिकाचा वार्ताहर दिनेश भानुशाली याच्याही मुसक्या गुन्हे शाखेने आवळल्या होत्या. मुलुंड, नवघर येथील रेशन दुकानदाराकडे हे दोघे ३ लाखांची खंडणी मागत होते. त्यासाठी दुकानदाराला या दोघांनी धमकावण्यास सुरुवात केली होती. घाबरून दुकानदाराने या दोघांना २५ हजार रुपये दिले होते. त्यानंतर या दोघांनी उर्वरित रकमेसाठी दुकानदाराला धमक्या देण्यास सुरुवात केली. तेव्हा दुकानदाराने गुन्हे शाखेकडे धाव घेतली. तपासाची जबाबदारी घाटकोपर कक्षाकडे आली. युनिटचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट पाटील आणि पथकाने सापळा रचून या दोघांना अटक केली.(प्रतिनिधी)