‘त्या’ घटनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By Admin | Updated: September 5, 2014 02:17 IST2014-09-05T02:17:57+5:302014-09-05T02:17:57+5:30

कुत्र चावलेल्या कुष्ठरुणाला उपचार न देताच रुग्णालयातून हुसकावल्याच्या घटनेचा महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेने निषेध केला

Complaint to the Chief Minister of the 'incident' | ‘त्या’ घटनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

‘त्या’ घटनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

कल्याण -  कुत्र चावलेल्या कुष्ठरुणाला उपचार न देताच रुग्णालयातून हुसकावल्याच्या घटनेचा महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेने निषेध केला असून याप्रकरणी संबंधित डॉक्टर आणि कर्मचा:यांवर कारवाई करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. 
कल्याणमधील हनुमाननगर कुष्ठरुग्ण वसाहतीत वास्तव्याला असलेले कुष्ठरुग्ण अल्लाबक्ष कमीनपुरा यांना कुत्र चावल्याने ते उपचारासाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात गेले होते. परंतु, उपचार न करताच त्यांना तेथून हुसकावून लावण्याचा संतापजनक प्रकार मागील आठवडय़ात घडला होता. याबाबत स्थानिक हनुमान नगर कुष्ठरुग्ण संघटनेने नाराजी व्यक्त केली असताना महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेनेही या घटनेचा निषेध केला आहे. संघटनेचे अध्यक्ष बळीराम तांबडे यांनी  थेट मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे तक्रार करून गांभीर्याने दखल घेऊन निंदनीय वागणूक देणा:या संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तांबडे यांनी उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमत्र्यांचेही याकडे लक्ष वेधले आहे. याप्रकरणी योग्य कारवाई न झाल्यास कुष्ठरुग्ण संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
 
डॉक्टर फिरकलेच नाहीत 
च्लोकमतने या घटनेला वाचा फोडताच जाग आलेले केडीएमसीचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लीलाधर मस्के हे बुधवारी कुष्ठरुग्ण वसाहतीत जाऊन संबंधित रुग्णाची भेट घेणार होते. परंतु, ते वसाहतीकडे फिरकलेच नाहीत, अशी माहिती प्रदीप गायकवाड यांनी दिली. दरम्यान डॉक्टर मस्के यांच्याप्रमाणो केडीएमसीचे आयुक्त रामनाथ सोनवणो यांनी देखील रुग्णावर उपचार केल्याचा दावा केला आहे. डॉक्टरांप्रमाणो आयुक्त हे देखील खोटे बोलत आहेत, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे. गायकवाड हे कल्याणच्या हनुमाननगर कुष्ठरुग्ण संघटनेचे अध्यक्ष आहेत. 

 

Web Title: Complaint to the Chief Minister of the 'incident'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.