विनोद घोसाळकर यांच्याविरोधात तक्रार दाखल
By Admin | Updated: October 10, 2014 03:11 IST2014-10-10T03:11:14+5:302014-10-10T03:11:14+5:30
दहिसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकरांनी महायुतीच्या नेत्यांची छायाचित्रे वोटर स्लीपवर छापण्याची लेखी तक्रार भाजपच्या मनीषा चौधरी यांनी निवडणूक आयोगाकडे केली

विनोद घोसाळकर यांच्याविरोधात तक्रार दाखल
मुंबई : दहिसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकरांनी महायुतीच्या नेत्यांची छायाचित्रे वोटर स्लीपवर छापण्याची लेखी तक्रार भाजपच्या मनीषा चौधरी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या वोटर स्लीपवर उध्दव, आदित्य ठाकरेंसह नरेंद्र मोदी,उत्तर मुंबई भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, रामदास आठवले यांचे छायाचित्र आहे. महायुती तुटण्याआधी घोसाळकरांनी या वोटर स्लीप तयार करुन घरोघरी वितरीत केल्या होत्या. युती तुटली तरी घोसाळकर स्लीपचे वितरण करत असल्याने चौधरी यांनी तक्रार दाखल केली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडूनही निवडणूक आयोगाला लेखी तक्रार केली असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
या प्रकरणी विनोद घोसाळकर यांनी सांगितले की, त्या वोटर स्लीप नसून लॅमिनेटेड फॅमिली कार्ड असल्याचे सांगितले. फॅमिली कार्ड हे युती तुटण्याआधी वितरीत करण्यात आले होते. त्या कार्डवर पूर्ण परिवाराचा तपशील असून त्यात प्रकाशकाचे नाव व वितरीत केल्याची तारीख आहे. युती तुटण्यापूर्वी पक्षाने माझी उमेदवारी निश्चित केली होती. उमेदवारीचा फॉर्म भरल्यानंतर कोणताही महायुतीचा फोटो असलेले कार्ड मी वितरीत केले नसून माझ्याविरोधात खोटी तक्रार केल्याचे त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)