रती अग्निहोत्री यांची पतीविरोधात तक्रार

By Admin | Updated: March 15, 2015 01:03 IST2015-03-15T01:03:08+5:302015-03-15T01:03:08+5:30

अभिनेत्री रती अग्निहोत्री यांनी पती अनिल विरवानी यांच्या विरोधात शारीरिक व मानसिक छळ दिल्याची तक्रार शनिवारी केली.

Complaint against Rati Agnihotri's husband | रती अग्निहोत्री यांची पतीविरोधात तक्रार

रती अग्निहोत्री यांची पतीविरोधात तक्रार

मुंबई : अभिनेत्री रती अग्निहोत्री यांनी पती अनिल विरवानी यांच्या विरोधात शारीरिक व मानसिक छळ दिल्याची तक्रार शनिवारी केली. त्यानुसार पोलिसांनी विरवानी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
शनिवारी दुपारी तक्रार देण्यासाठी रती स्वत: वरळी पोलीस ठाण्यात आल्या. हुंडयासाठी छळ, मारहाण, अश्लिल शिवीगाळ या कलमान्वये विरवानी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला. रती यांच्या जबाबानुसार सुरुवातीच्या काही वर्षांनंतर विरवानी मानसिक व शारिरिक छळ करू लागले. ७ मार्च रोजी विरवानी यांनी आपल्यावर हात उचलला, मारहाण केली, असेही रती यांनी सांगितले. अद्याप या गुन्हयात अटकेची कारवाई झालेली नाही. तपास सुरू आहे, अशी माहिती परिमंडळ तीनचे उपायुक्त जय कुमार यांनी लोकमतला दिली.
ह्यएक दुजे के लिएह्ण या चित्रपटाद्वारे रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या रती १९८५मध्ये विरवानींसोबत विवाहबद्ध झाल्या होत्या. रती यांचा मुलगा तनुज यानेही बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले आहे.

Web Title: Complaint against Rati Agnihotri's husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.