रामगोपाल यांच्या विरोधात तक्रार
By Admin | Updated: September 7, 2014 01:53 IST2014-09-07T01:53:10+5:302014-09-07T01:53:10+5:30
दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी गणपतीबाबत टि¦टरवर केलेल्या विधानाविरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात खाजगी तक्रार करण्यात आली आह़े

रामगोपाल यांच्या विरोधात तक्रार
30 सप्टेंबरला सुनावणी
मुंबई : दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी गणपतीबाबत टि¦टरवर केलेल्या विधानाविरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात खाजगी तक्रार करण्यात आली आह़े
विकी शेट्टी यांनी ही तक्रार केली आह़े वर्मा यांनी त्यांच्या टि¦ट अकाऊंटरवर गणपतीबाबत विधान केले होत़े मात्र गणपती हे हिंदूंचे दैवत आह़े या देवाची मनोभावे पूजा केली जात़े त्यामुळे वर्मा यांनी गणपतीसंदर्भात केलेले विधान गैर असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आह़े गणपतीबाबत रामगोपाल वर्माने टि¦टरवरून आक्षेपार्ह आणि समाजात तेढ निर्माण करणारे विधान केले होते.
अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात या तक्रारीवर सुनावणी झाली़ या तक्रारीतील कोणत्या मुद्दयांवर सुनावणी घेतली जाईल हे ठरवण्यासाठी न्यायालयाने यावरील सुनावणी 3क् स्पटेंबर्पयत तहकूब केली़ (प्रतिनिधी)