मंदा म्हात्रे यांच्या विरोधात तक्रार

By Admin | Updated: April 14, 2015 01:57 IST2015-04-14T01:57:59+5:302015-04-14T01:57:59+5:30

भाजपाच्या प्रदेश सचिव वर्षा भोसले यांनी त्यांच्याच पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे.

Complaint against Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांच्या विरोधात तक्रार

मंदा म्हात्रे यांच्या विरोधात तक्रार

नवी मुंबई : भाजपाच्या प्रदेश सचिव वर्षा भोसले यांनी त्यांच्याच पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. सीबीडी येथे झालेल्या भाजपाच्या बैठकीत हा प्रकार घडला आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीबीडी येथील के. स्टार हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. समन्वयक आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आमदार मंदा म्हात्रे व भाजपा प्रदेश सचिव वर्षा भोसले यांच्यासह बेलापूर क्षेत्रातील उमेदवार उपस्थित होते. यावेळी वर्षा भोसले यांच्याविरोधात तक्रार असलेली एक बाहेरची व्यक्ती तेथे आली. या बैठकीत कोणी बोलावले, यावरून आमदार मंदा म्हात्रे आणि वर्षा भोसले यांच्यात बाचाबाची झाली. त्यांच्यातील हा शाब्दिक वाद टोकाला पोहोचल्याचे समजते. केळकर यांच्या समक्ष घडलेल्या या प्रकाराची तक्रार भोसले यांनी पोलिसांकडे केली आहे. तक्रारीत मंदा म्हात्रे व त्यांचा मुलगा नीलेश यांनी शिवीगाळ केल्याचे भोसले यांनी म्हटले आहे. त्यानुसार सीबीडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याचे सहाय्यक आयुक्त धनराज दायमा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Complaint against Manda Mhatre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.