जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये निकृष्ट खाद्यपदार्थ असल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 05:46 IST2019-07-19T05:46:17+5:302019-07-19T05:46:22+5:30
दादरहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि इतर असुविधा असल्याचे उघड झाले.

जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये निकृष्ट खाद्यपदार्थ असल्याची तक्रार
मुंबई : दादरहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि इतर असुविधा असल्याचे उघड झाले.
१६ जुलै रोजी पहाटे ५.२५ वाजताच्या जनशताब्दी एक्स्प्रेसमधून प्रवास करताना प्रवासी नितीन जठार यांना सर्वत्र झुरळे फिरताना दिसली. आसनव्यवस्था फाटक्या आणि जीर्ण झालेल्या, शौचालयाची दुरावस्था होती. त्यामुळे त्यांनी तक्रार दिली. यामुळे प्रवाशांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांनी केली.