तक्रारदारांना पोलिसांकडून मारहाण

By Admin | Updated: December 7, 2015 01:28 IST2015-12-07T01:28:32+5:302015-12-07T01:28:32+5:30

चोरीस गेलेल्या मोबाइलची माहिती घेण्यासाठी गेलेल्या तक्रारदार कुटुंबीयांना चेंबूर पोलिसांनी पोलीस ठाण्यात मारहाण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.

The complainants beat the police | तक्रारदारांना पोलिसांकडून मारहाण

तक्रारदारांना पोलिसांकडून मारहाण

मुंबई: चोरीस गेलेल्या मोबाइलची माहिती घेण्यासाठी गेलेल्या तक्रारदार कुटुंबीयांना चेंबूर पोलिसांनी पोलीस ठाण्यात मारहाण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. यासंदर्भात नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी या प्रकरणी चौकशीचे दिले आहेत.
चेंबूर येथील आर.सी. बरॅक परिसरात राजपाल कुटुंबीय राहण्यास आहे. २१ आॅगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घरातील तीन महागडे मोबाइल लंपास केले. राजपाल कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून चेंबूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. चेंबूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुनील सोनवलकर यांनी अनिल राजपाल यांचा भाचा महेश याला ४ डिसेंबरच्या मध्यरात्री फोन करून आम्ही एका चोराला पकडले आहे. त्याच्याजवळून काही मोबाइल हस्तगत करण्यात आले असून, तुमच्या चोरी झालेल्या मोबाइलची ओळख पटविण्यासाठी तुम्हाला पोलीस ठाण्यात यावे लागेल, असे सांगितले.
अनिल राजपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी आपल्याला मध्यरात्री पोलीस ठाण्यात बोलावत असल्याने मीही महेशसोबत गेलो. चेंबूर पोलीस ठाण्यात पोहोचलो असता, फोन करणारा पोलीस अधिकारी सोनवलकर हे जेवण करत असून तुम्हाला बसावे लागेल, असे अन्य पोलीस अधिकाऱ्याने महेशला सांगितले. सुमारे अर्ध्या तासाने आलेले सोनवलकर दारूच्या नशेत होते. त्यांनी आपल्याला पोलीस ठाण्यात आणि गुन्हे प्रकटीकरण कक्षात जबर मारहाण केल्याचा आरोप अनिल राजपाल यांनी केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाइलची ओळख पटविण्यासाठी तक्रारदार कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले, तेव्हा ते दारूच्या नशेत होते. त्याबाबत त्यांना अधिक विचारणा केली असता, त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पीएसआय सोनलकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रात्री दोघांचेही मेडिकल रिपोर्ट केले असता, त्यामध्ये त्यांनी दारूचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले.
अनिल राजपाल हा अभिलेखावरील आरोपी असून, २०१३मध्ये एका इसमाच्या आत्महत्येस जबाबदार ठरल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. ना.म. जोशी मार्ग आणि गोवंडी पोलीस ठाण्यातही त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. वैद्यकीय अहवालात राजपालच्या अंगावर कुठेही मार लागल्याचे नमूद नाही. केवळ स्वत:च्या स्वार्थ हेतूसाठी हे कुटुंबीय खोटे मेसेज फिरवत असल्याचे चेंबूर पोलिसांचे म्हणणे आहे. अनिल आणि महेश यांच्यावर चेंबूर पोलिसांनी भादंवि कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करत शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले होते. दोघांचीही वेैद्यकीय तपासणी करून पुन्हा पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मुंबई पोलीस कायदा ११० अन्वये कारवाई करण्यात आली. त्यांना १२५० रुपये दंड भरण्यासाठी दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर राहण्यास बजावले. अनिल आणि महेश यांनी पोलीस ठाण्यातील मारहाणीची लेखी तक्रार केल्यानंतर पोलीस उपायुक्त निशानदार यांनी चौकशीचे आदेश दिले. (प्रतिनिधी)

Web Title: The complainants beat the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.