मुंबई विद्यापीठात स्पर्धापरीक्षा प्रशिक्षण

By Admin | Updated: June 6, 2014 22:44 IST2014-06-06T21:44:14+5:302014-06-06T22:44:26+5:30

प्रशिक्षण अकादमीतर्फे युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण वर्ग भरविण्यात येणार आहेत. यासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सुरुवातीला एक प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे.

Competition Training in Mumbai University | मुंबई विद्यापीठात स्पर्धापरीक्षा प्रशिक्षण

मुंबई विद्यापीठात स्पर्धापरीक्षा प्रशिक्षण

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या प्रशासकीय व्यवस्थापन प्रशिक्षण अकादमीतर्फे युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण वर्ग भरविण्यात येणार आहेत. यासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सुरुवातीला एक प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीप्राप्त अथवा शेवटच्या वर्षामध्ये असलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. या प्रशिक्षणासाठी विद्यापीठामार्फत १३ जुलै रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेनंतर पात्र उमेदवारांची यादी लावण्यात येणार असून सुमारे १00 विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणासाठी प्रवेश देण्यात येईल. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये विद्यापीठाच्या तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच अकादमीमध्ये अनेक दर्जेदार व विश्वासाहार्य साधने, पुस्तके व नियतकालिके उपलब्ध करुन दिले जातात.

Web Title: Competition Training in Mumbai University