मेलवरून साथीदारांचा माग

By Admin | Updated: December 9, 2014 02:52 IST2014-12-09T02:52:57+5:302014-12-09T02:52:57+5:30

आरिफ माजिदच्या तपासणीत मिळालेल्या ई-मेल आयडीवरून लवकरात लवकर त्याच्या साथीदारांचा माग लावण्याचा प्रयत्न करत आहे.

Companion Trail from Mail | मेलवरून साथीदारांचा माग

मेलवरून साथीदारांचा माग

>डिप्पी वांकाणी -  मुंबई
दहशतवादी अबु जिंदालप्रकरणी केलेल्या चुका टाळून नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) आरिफ माजिदच्या तपासणीत मिळालेल्या ई-मेल आयडीवरून लवकरात लवकर त्याच्या साथीदारांचा माग लावण्याचा प्रयत्न करत आहे. 
भारताचा अमेरिकेबरोबर कायद्याशी निगडीत परस्पर सामंजस्याचा करार आहे. पण त्यातही उपलब्ध ऑनलाइन माहिती सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ  ठेवली द्य
जात नाही. त्यामुळेच अबु जिंदालप्रकरणी तपास यंत्रणा गुगल किंवा फेसबुकसारख्या कंपन्यांकडून फारशी माहिती मिळवू शकल्या नव्हत्या.
भारताच्या परराष्ट्र खात्याकडून अमेरिकी न्यायालयांमार्फत तेथील कंपन्यांना त्यांच्याकडील माहिती देण्याची विनंती केली जाते. 
माहिती मागवण्याची ही प्रक्रिया फार वेळखाऊ आणि किचकट आहे. या कंपन्या सहा महिन्यांनंतर 
माहिती डिलिट करतात. त्यामुळे त्यांच्याकडून मिळालेल्या ई-मेल आयडींचा फारसा उपयोग झाला नव्हता. 
या अनुभवातून एनआयए धडा घेत आहे. आता इराकमधून परतलेल्या कल्याणच्या आरिफच्या तपासातही तीन-चार जणांचे ई-मेल आयडी मिळाले आहेत. त्यावरून त्याला ब्रेनवॉश करणा-यांचे किंवा मदत करणा-यांचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. 
त्यातून दहशतवाद्यांचे स्लीपर सेल उघडकीस आणून पुढील अनर्थ टाळता येईल. तपासात महाराष्ट्र, इराक आणि सीरियातील काही अकाऊंट्स मिळाली आहेत. 
म्हणूनच एनआयएने परराष्ट्र खात्यामार्फत गुगल आणि फेसबुकसारख्या अमेरिकी कंपन्यांकडून माहिती मागवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे, असे सूत्रंनी सांगितले.
 
1इसिस या अतिरेकी संघटनेत 
सामील झालेला कल्याण येथील आरिफ माजिदच्या राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कोठडीत 
विशेष न्यायालयाने 22 डिसेंबर्पयत वाढ केली़  विशेष न्यायाधीश वाय़ डी़ शिंदे यांच्यासमोर आरिफला सोमवारी हजर करण्यात आल़े त्यात सरकारी गीता गुडंबे यांनी आरिफच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी  केली़ 
2त्या म्हणाल्या, आरिफची चौकशी 
सुरू असून त्याच्याकडून अजून 
काही माहिती एनआयएला हवी आह़े त्याच्याकडील इलेक्ट्रॉनीक डेटा हस्तगत केलेला नाही़ त्याला डेटा देणारा कोण आहे याचा शोध घ्यायचा आह़े तसेच त्याच्यासोबत यात्रेला गेलेल्या अन्य तिघांबाबतही आरिफची चौकशी करायची असल्याने त्याच्या कोठडीत वाढ करावी़
 
एनआयएचे 
कान उपटले
एनआयएने केलेल्या अर्जात अनेक चुका असल्याने न्यायालयाने या तपास यंत्रणोला चांगलेच फटकारल़े अर्ज करताना एका शिक्षकाला सोबत ठेवा व तो अर्ज नीट वाचून दाखल करा़ वाक्य चुकवू नका, असे खडे बोल न्यायालयाने एनआयएला सुनावल
 
च्अॅड़ गुडंबे यांची विनंती मान्य करत न्यायालयाने आरिफच्या कोठडीत वाढ केली़ त्याच वेळी आरिफने अर्ज करून आपण निदरेष असल्याचा दावा केला़ 
 
च्महत्त्वाचे म्हणजे चौकशीसाठी काही अत्याधुनिक चाचणी करायच्या असल्यास त्याआधी न्यायालयाची परवानगी द्यावी़ तसेच माध्यमांना मीडिया ट्रायल न चालवण्याचे निर्देश द्यावेत, असेही अर्जात नमूद केले आह़े 

Web Title: Companion Trail from Mail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.