राष्ट्रकुल स्पध्रेत क्रिकेट नाहीच!
By Admin | Updated: July 25, 2014 01:16 IST2014-07-25T01:16:00+5:302014-07-25T01:16:00+5:30
राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्याच्या सर्व प्रय}ांना गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) हाणून पाडले.

राष्ट्रकुल स्पध्रेत क्रिकेट नाहीच!
मुंबई : राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्याच्या सर्व प्रय}ांना गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) हाणून पाडले. कोणत्याही परिस्थितीत क्रिकेटला राष्ट्रकुलमध्ये समाविष्ट न करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम असलेल्या आयसीसीने यासंदर्भातला प्रस्ताव फेटाळला आणि 2क्18 मध्ये ऑस्ट्रेलियात होणा:या स्पध्रेर्पयत तरी क्रिकेटचा राष्ट्रकुलमध्ये समावेश नसेल, असे स्पष्ट केले.
राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे अध्यक्ष प्रिंस टुंकू इमरान म्हणाले, की या स्पर्धामध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात यावा याबाबतचा प्रस्ताव 2क्12मध्ये आम्ही आयसीसीसमोर ठेवला होता. त्यात आम्ही 2क्14च्या ग्लास्गो व 2क्18च्या स्पध्रेचा समावेश होता. परंतु, तो आयसीसीने फेटाळला. याबाबत आयसीसीचे प्रवक्ता म्हणाले, 2क्14 व 2क्18 राष्ट्रकुल स्पध्रेत पुरुष व महिला टी -2क् क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रस्ताव होता; परंतु यावर अद्याप निर्णय झालेला नाही.
1998 मध्ये क्वालालम्पूर स्पर्धामध्ये पहिल्यांदा आणि शेवटचे 5क् षटकांच्या क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यात दक्षिण आफ्रिकेने सुवर्णपदक पटकावले होते.