बाळासाहेबांच्या स्मारकासाठी समिती
By Admin | Updated: December 10, 2014 02:51 IST2014-12-10T02:51:56+5:302014-12-10T02:51:56+5:30
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक मुंबईत उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे.

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी समिती
दादर, वांद्रे येथे जागेचा शोध
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक मुंबईत उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. दादर किंवा वांद्रे भागात हे स्मारक व्हावे, यासाठी समिती जागेचा शोध घेणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव पी.एस.मीना, मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (1) मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव (2) श्रीकांत सिंह, कोकणचे विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार, मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया हे या समितीचे सदस्य आहेत.