‘सिटीझन ऑफ मुंबई’ पुरस्काराने आयुक्तांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:06 IST2021-02-07T04:06:32+5:302021-02-07T04:06:32+5:30

मुंबई : कोविड काळात महापालिकेने केलेल्या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. ‘सिटीझन ऑफ मुंबई’ या पुरस्काराने पालिका आयुक्त ...

Commissioner honored with 'Citizen of Mumbai' award | ‘सिटीझन ऑफ मुंबई’ पुरस्काराने आयुक्तांचा गौरव

‘सिटीझन ऑफ मुंबई’ पुरस्काराने आयुक्तांचा गौरव

मुंबई : कोविड काळात महापालिकेने केलेल्या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. ‘सिटीझन ऑफ मुंबई’ या पुरस्काराने पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना गौरविण्यात आले. रोटरी क्लब ऑफ मुंबईचे अध्यक्ष फ्रामरोज मेहता यांच्या हस्ते हा पुरस्कार पालिका मुख्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार यापूर्वी बी.जी. देशमुख, न्यायमूर्ती सुजाता मनोहर, डॉ. रघुराम राजन, दीपक पारेख यासारख्या महनीय व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना, हा गौरव खऱ्या अर्थाने महापालिकेच्या सर्व कामगार-कर्मचारी व अधिकाऱ्यांचा असल्याचे मत आयुक्तांनी व्यक्त केले. हा पुरस्कार त्यांनी महापालिकेच्या सामूहिक भावनेला समर्पित केला.

या कार्यक्रमापूर्वी ‘रोटरी क्लब’द्वारे ऑनलाइन स्वरूपाच्या पुरस्कार प्रदान सोहळ्याचेदेखील आयोजन करण्यात आले होते. ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या सदर सोहळ्यास अनेक मान्यवर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Commissioner honored with 'Citizen of Mumbai' award