Join us  

दिलासादायक, मुंबईतील पाणी 99.34 टक्के शुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 5:45 AM

गळती दुरुस्त; झोपडपट्टी भागातील नमुन्यांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईचेपाणी अशुद्ध असल्याची ओरड अनेकदा करण्यात येते. मात्र यात काहीही तथ्य नसल्याचे समाेर आले आहे. आजवर केलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईच्या पाण्याच्या शुद्धतेत ९९.३४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

पंतप्रधान जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत  ग्राहक व्यवहार मंत्रालय यांच्यातर्फे देशातील २१ शहरांमध्ये नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने गोळा करून तपासण्यात आले. याअंतर्गत मुंबईतील वरळी, करीरोड, शिवडी, मालाड, कांदिवली, जोगेश्वरी, पवई, साकीनाका, घाटकोपर, चेंबूर येथील झोपडपट्टीच्या भागातून पाण्याचे नमुने गोळा केले हाेते.  या नमुन्यांच्या तपासणीअंती मुंबईतील पिण्याचे पाणी ९९.३४ टक्के शुद्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. सन २०१३ - १४ ते २०१९ - २० या कालावधीत जीर्ण झालेल्या विविध व्यासाच्या २५० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. १ लाख  ७५ हजार  ठिकाणची गळती शोधून तेथील दुरुस्ती करण्यात आली. विविध ठिकाणी कामे सुरू असताना रस्ते सुधार कार्यक्रमांतर्गत ८९ हजार ९०८ जोडण्या बदलण्यात आल्या. विविध जलद बोगद्यांचे काम पूर्ण करण्यात आले. विविध उपाययोजनांमुळे पाण्याच्या  शुद्धतेत ९९.३४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

१३० ठिकाणच्या नमुन्यांची तपासणी nदररोज ३८५० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. ३५८ ठिकाणी पाण्याचे नमुने गोळा केले जातात. n११० ते १३० ठिकाणाचे नमुने तपासले जातात.

 

टॅग्स :मुंबईपाणी