Join us  

Video - कपिल शर्माचा उद्धटपणा कॅमेऱ्यात शूट, फोटोग्राफर्संना दरडावलं

By महेश गलांडे | Published: February 22, 2021 10:16 PM

कॉमेडियन कपिल शर्माचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा एका व्हील चेअरवर बसलेला असून त्याला ढलकत ढकलत पार्किंगच्या दिशेने नेण्यात येत आहे. यावेळी, तेथील कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सने कपिलचा व्हिडिओ शूट केला आहे

ठळक मुद्देकॅमेरामनने शूट केलेला व्हिडिओ डिलीट करण्याबाबत कपिलच्या सहकाऱ्यानेही कॅमेरामनला सांगितले. मात्र, कॅमेरामनने नकार दिला असून सध्या कपिलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई - कॉमेडियन कपिल शर्मा सोमवारी मुंबईत विमानतळावर उतरला, त्यावेळी चक्क व्हील चेअरवरुन कपिलला पार्कींगस्थळावर नेण्यात आले. तोंडाला मास्क, डोळ्यावर काळा गॉगल आणि काळा पोशाख परिधान करत कपिल शर्मा पार्कींगच्या दिशेने जाताना स्पॉट झाला आहे. बॉलिवूड पॅपने हा व्हिडिओ शूट केला असून आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्टही केला आहे. व्हायरल बयानीकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत कपिल फोटोग्राफर्संना उद्धटपणे बोलताना चित्रित झालं आहे. 

कॉमेडियन कपिल शर्माचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा एका व्हील चेअरवर बसलेला असून त्याला ढलकत ढकलत पार्किंगच्या दिशेने नेण्यात येत आहे. यावेळी, तेथील कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सने कपिलचा व्हिडिओ शूट केला आहे. मात्र, कॅमेरामन यांनी केलेला पाठलाग कपिलला अजिबात रुचला नाही. म्हणून, कपिलने कॅमेरामन यांना सुनावलं. उल्लू के पठ्ठो असे म्हणत कपिलने कॅमेरामनशी उद्धटपणे वर्तन केलंय. विशेष म्हणजे हे कॅमेऱ्यात शूट झालंय,असे म्हटल्यावरही कपिलने पुन्हा आपला तोरा कायम ठेवला. ओये हटो पिछे सारे तुम लोग, तुम लोग बत्तमिजीयाँ करते हो.. असे कपिल म्हणाला. 

कॅमेरामनने शूट केलेला व्हिडिओ डिलीट करण्याबाबत कपिलच्या सहकाऱ्यानेही कॅमेरामनला सांगितले. मात्र, कॅमेरामनने नकार दिला असून सध्या कपिलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कपिलच्या उद्धटपणावरुनही अनेकांनी कपिलला सुनावलं आहे. तर, काहींनी कपिलच्या विमानातील हरकींच्या आठवणही जाग्या केल्या आहेत. दुसरीकडे, कपिलचा हा अवतार पाहून त्याच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय. कपिलला नेमकं काय झालंय, असा प्रश्न कपिलच्या चाहत्यांना आणि नेटीझन्सला पडला आहे. 

टॅग्स :कपिल शर्मा बॉलिवूडविमानतळसोशल मीडिया