Join us

शिवबंधनासाठी मातोश्रीवर या; मुख्यमंत्र्यांचा निरोप, शिवसेना-संभाजीराजेंच्या वाटाघाटी अनिर्णित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 05:34 IST

आधी शिवबंधन आणि मगच उमेदवारी ही शिवसेनेची ऑफर संभाजीराजे यांनी अजून स्वीकारलेली नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यातील रविवारच्या वाटाघाटी अनिर्णित राहिल्या. आधी शिवबंधन आणि मगच उमेदवारी ही शिवसेनेची ऑफर संभाजीराजे यांनी अजून स्वीकारलेली नाही. 

महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवाराचा नवा पर्याय समोर आला असला तरी त्यावरही एकमत झालेले नाही. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेना नेते खा. अनिल देसाई, सचिव मिलिंद नार्वेकर यांनी हॉटेल ट्रायडन्ट येथे संभाजीराजे यांची भेट घेत उमेदवारीबाबत चर्चा केली. खा. संजय राऊत यांनीही संभाजीराजे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. राजे, उद्या शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर या, असा निरोप राऊत यांच्याकरवी मुख्यमंत्री ठाकरे यांनी संभाजीराजे यांना दिला आहे.

टॅग्स :महाविकास आघाडीसंभाजी राजे छत्रपतीशिवसेनाराज्यसभा