आओ जाओ घर तुम्हारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:05 AM2021-03-22T04:05:27+5:302021-03-22T04:05:27+5:30

आओ जाओ घर तुम्हारा रेल्वे स्थानकात अँटिजेन तपासणी रेल्वे स्थानक दादर रेल्वेस्थानकावर राज्यातील विविध भागांतून आणि परराज्यांतील विविध रेल्वेगाड्यांसाठी ...

Come and go home yours | आओ जाओ घर तुम्हारा

आओ जाओ घर तुम्हारा

Next

आओ जाओ घर तुम्हारा

रेल्वे स्थानकात अँटिजेन तपासणी

रेल्वे स्थानक

दादर रेल्वेस्थानकावर राज्यातील विविध भागांतून आणि परराज्यांतील विविध रेल्वेगाड्यांसाठी थांबा आहे. मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असल्याने परराज्यांतील मजूरवर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित झालेला मजूरवर्ग पुन्हा एकदा राज्यात येत आहे. मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, पालिकेकडून गर्दीच्या ठिकाणी अँटिजेन चाचणी सुरू केली आहे. दादर रेल्वेस्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे या प्रवाशांची अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे. तसेच प्रवासी उतरल्यावर रेल्वे गाडीत निर्जंतुकीकरण केले जात आहे. यासोबतच जे प्रवासी मास्क घालत नाहीत, त्यांच्यावर पालिका आणि रेल्वे पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

Web Title: Come and go home yours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.