खारघरला टोलवसुलीची रंगीत तालीम
By Admin | Updated: December 27, 2014 00:52 IST2014-12-27T00:52:48+5:302014-12-27T00:52:48+5:30
खारघर टोल नाक्यावर सध्या टोल वसुलीची रंगीत तालीम सुरू असून वाहने उभे करून ट्रायल घेतली जात आहे

खारघरला टोलवसुलीची रंगीत तालीम
पनवेल : खारघर टोल नाक्यावर सध्या टोल वसुलीची रंगीत तालीम सुरू असून वाहने उभे करून ट्रायल घेतली जात आहे. शासकीय आदेशाकडे संबंधीत कंपनी डोळे लावून बसली असून शासकीय आदेश निघाला की वसुलीला सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी नाक्यावरील ट्रायल वाहन चालकांकरिताही कुतुहलाचा विषय बनला आहे.
मुंंबई-पुणे अंतर कमी करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने पनवेल-सायन महामार्गाचे रुंदीकरण केले आहे. बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्त्वावर सिमेंटचा आठ पदरी रस्ता तयार करण्यात आला आहे. याकरिता सुरुवातीला १२०० कोटींचे बजेट मंजूर करण्यात आले होते. मात्र हा खर्च १७०० कोटींवर पोहोचला. या टोलनाक्यावर बरेच राजकारण झाल्यानंतर स्थानिकांना यातून सूट मिळण्यात यश आले आहे. टोल नाक्याच्या ठिकाणी इंडिकेटर बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर वाहनांना थांबविण्यासाठी स्पीड ब्रेकर, फाटकाचीही व्यवस्था आहे. या ठिकाणाहून जाणाऱ्या वाहनांची मोजदाद झाली आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक बुथमध्ये संगणकीय प्रणाली बसविण्यात आली असून त्या ठिकाणी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत. गाड्या आल्यानंतर कशा पद्धतीने फाटक खाली करायचे, त्यांच्याकडून टोलचे पैसे घेऊन पावती देणे, टोल देण्यास नकार देणाऱ्या वाहनांना अडवणे आदि गोष्टींचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. लवकरच हा टोलनाका सुरू होणार असल्याने कर्मचा-यांना
दरम्यान विधानसभा निवडणुकीत खारघर टोलचा मुद्दा गाजला होता. पनवेल आणि परिसरातील स्थानिकांना टोलमधून सूट मिळावी यासाठी प्रशांत ठाकूर यांनी निवडणुकीपूर्वी आमदारकीचा राजीनामा दिला होता. तसेच टोल रद्द करण्यासाठी आंदोलने करण्यात आली होती. आता प्रशांत ठाकूर सत्ताधारी पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. तर स्थानिकांना या टोलमधून सूट मिळाली असली तरी कोकणात जाणा-या प्रवाशांना मात्र टोलचा भार सहन करावा लागणार आहे. (वार्ताहर)