Join us

महापालिकेच्या दुय्यम अभियंत्याला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 02:23 IST

महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील सहायक आयुक्तांना धक्काबुक्की होण्याचा प्रकार ताजा असताना आता दुय्यम अभियंत्याला मारहाण झाली आहे.

मुंबई : महापालिकेच्या जी दक्षिण विभागातील सहायक आयुक्तांना धक्काबुक्की होण्याचा प्रकार ताजा असताना आता दुय्यम अभियंत्याला मारहाण झाली आहे. यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून संबंधितांना तत्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अभियंत्यांच्या संघटनेने दिला आहे.फेरीवाल्यांवर काय कारवाई केली? याबाबत जाब विचारायला गेलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्र जैन व परवाना अधिकाºयाला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी घडली. मात्र सोमवारी संध्याकाळी प्रभादेवी येथे जी दक्षिण विभागाचे दुय्यम अभियंता सुशांत गोडबोले यांना काही जणांनी मारहाण केली. संबंधितांना तत्काळ अटक करण्यास पोलिसांना भाग पाडून अशा हल्लेखोरांना जरब बसवावी, असे साकडे बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स युनियनने आयुक्त अजोय मेहता यांना घातले आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका