विरारमधून कॉलेज तरुणीचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2016 18:20 IST2016-10-11T18:20:53+5:302016-10-11T18:20:53+5:30
विरार पूर्वेकडील एका वीस वर्षीय कॉलेज तरुणीचे अपहरण केल्यानंतर तिला पालघर रेल्वे स्टेशनवर सोडण्यात आल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात

विरारमधून कॉलेज तरुणीचे अपहरण
>ऑनलाइन लोकमत
विरार, दि. 11 - विरार पूर्वेकडील एका वीस वर्षीय कॉलेज तरुणीचे अपहरण केल्यानंतर तिला पालघर रेल्वे स्टेशनवर सोडण्यात आल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघेही फरार आहेत.
९ ऑक्टोबरला दुपारी तीनच्या सुमारास शाईन शेख हिला तिच्या राहत्या घराजवळून सबरजित विश्वकर्मा, पंकज विश्वकर्मा आणि पंकजचा मित्र असे तिघांनी अपहरण केल्याची तक्रार तिची आई आसिफा शेख हिने केली होती.
याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोध मोहिम हाती घेतली. दुस-या दिवशी १० ऑक्टोबरला सकाळी अकराच्या सुमारास पालघर रेल्वे स्टेशनवर शाईनला सोडण्यात आले. शाईनने स्वतः आपल्या नातेवाईकाला फोन करून आपण पालघर रेल्वे स्टेशनवर असल्याची माहिती दिली.
दरम्यान, अपहरण प्रकरणी शाईन कोणतीही माहिती देत नसून आपल्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती असे सांगितल्याने पोलीस चक्रावून गेले आहेत. तिची मानसिक अवस्था ठिक नसल्याने तिच्याकडून माहिती मिळू शकत नाही. पोलिसांनी याप्रकरणी तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर शारिरिक अत्याचार झाले नसल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी तिघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघेही फरार आहेत.