दिंडाेशीत १५० पिशव्या रक्त संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:06 IST2021-06-21T04:06:27+5:302021-06-21T04:06:27+5:30

मुंबई : शिवसेना युवासेना दिंडोशी विधानसभा पुरस्कृत युवा राजे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त दिंडोशीत ...

Collection of 150 bags of blood in Dinda | दिंडाेशीत १५० पिशव्या रक्त संकलन

दिंडाेशीत १५० पिशव्या रक्त संकलन

मुंबई : शिवसेना युवासेना दिंडोशी विधानसभा पुरस्कृत युवा राजे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त दिंडोशीत रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मालाड पूर्व कुरार व्हिलेज येथील सईबाई विद्या मंदिरात आयोजित रक्तदान शिबिरात १५० पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. तरुणींनीही यावेळी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिरास शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी उपस्थिती दर्शवली आणि रक्तदात्यांचे आभार मानले. यावेळी आमदार प्रभू यांच्या हस्ते रक्तदात्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

यावेळी विधानसभा संघटक प्रशांत कदम व विष्णू सावंत, उपविभागप्रमुख प्रदीप निकम, नगरसेवक आत्माराम चाचे, शाखाप्रमुख मोहन परब, रमेश कळंबे, युवासेना मुंबई समन्वयक समृद्ध शिर्के, युवासेना उपविभाग अधिकारी निलेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

-----------------------------------------

Web Title: Collection of 150 bags of blood in Dinda