राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांतून एकत्र
By Admin | Updated: October 31, 2014 22:55 IST2014-10-31T22:55:42+5:302014-10-31T22:55:42+5:30
मानवाच्या अंत:करणात विचारांची स्वच्छता झाल्यास एक अब्जावर लोकसंख्या असलेला आपला देश कचरामुक्त होवून स्वच्छ भारत आणि समृध्द भारत बनण्यास वेळ लागणार नाही,

राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांतून एकत्र
जयंत धुळप - अलिबाग
मानवाच्या अंत:करणात विचारांची स्वच्छता झाल्यास एक अब्जावर लोकसंख्या असलेला आपला देश कचरामुक्त होवून स्वच्छ भारत आणि समृध्द भारत बनण्यास वेळ लागणार नाही, परंतु त्याकरिता प्रत्येक भारतीयाने आळस झटकून मनोनिश्चय पक्का करणो गरजेचे आहे आणि याच मनोनिश्चयाची वैचारिक बैठक तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. माणूस स्वत:च्या देहाची स्वच्छता करतो. प्रत्येकाने व्यक्तिगत स्वच्छतेबरोबरच आपले घर, आपला परिसर, आपले गाव, आपले शहर यामध्ये हेच स्वच्छता सूत्र मानवी एकात्मतेच्या भावनेतून राष्ट्रीय एकता म्हणून निश्चयपूर्वक अमलात आणले तर आपला जिल्हा, आपले राज्य आणि देश स्वच्छ होईल, असे विचार शुक्रवारी ज्येष्ठ निरुपणकार महाराष्ट्र भूषण तथा स्वच्छ भारत अभियानाचे शासन नियुक्त स्वच्छतादूत डॉ. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी अलिबाग येथे व्यक्त केले.
31 ऑक्टोबर ही सरदार वल्लभभाई पटेल यांची 139 वी जयंती दिन व इंदिरा गांधी स्मृतीदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या राष्ट्रीय एकता दिनाला रायगड जिल्हाधिकारी कार्यालय व रायगड जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी आयोजित राष्ट्रीय एकता रॅलीस हिरवा ङोंडा दाखवून ज्येष्ठ निरुपणकार व स्वच्छतादूत डॉ. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात या रॅलीचे रुपांतर एका विराट जाहीर सभेत झाले.
सकाळी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय एकता रॅलीत सहभागी झालेले शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध बँकांचे अधिकारी-कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, सरकारी अधिकारी व कर्मचारी व मोठय़ा प्रमाणात सहभागी झालेले श्री सदस्य नागरिक यांना राष्ट्रीय एकता, अखंडता आणि सुरक्षा अबाधित राखण्याची शपथ आप्पासाहेबांनी दिली.
यावेळी सचिनदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी, अलिबागचे आमदार सुभाष तथा पंडित पाटील, माजी आमदार मीनाक्षी पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड जि.प.अध्यक्ष सुरेश टोकरे, रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे, रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.शशिकांत महावरकर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कचरा विल्हेवाटीची व्यवस्था
सदस्यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून राज्यात सुरु असलेल्या ग्राम ते महानगर अशा स्वच्छता मोहिमेचे चांगले परिणाम साध्य होत आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रत केलेल्या स्वच्छता मोहिमेत 182 टन कचरा संकलित करण्यात आल्याचे सांगून या कामामध्ये सर्वानी सहभागी होणो गरजेचे असल्याचे आवाहन केले. कचरा माणसांची आरोग्य समस्या बनू नये याकरिता संकलित होणा:या कच:याची शास्त्रीयदृष्टय़ा विल्हेवाट लावण्याकरिता शासनाच्या माध्यमातून व्यवस्था निर्माण होणो गरजेचे असल्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्वच्छतादूत म्हणून सोपवलेली जबाबदारी पेलेन, असे त्यांनी सांगितले.
पंचमहाभूतांचा विसर
आपल्या मार्गदर्शनात डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी पुढे म्हणाले, सुदृढ मानवी मनाकरिता सुदृढ आरोग्याची नितांत गरज असते आणि सुदृढ आरोग्याकरिता स्वच्छता अत्यावश्यक आहे. स्वच्छता केवळ मानवी जीवनाकरिताच आवश्यक आहे असे नाही तर ती या भूतलावरील प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वाकरिता गरजेची आहे. संपूर्ण विश्वाच्या उत्पत्तीला कारण असणा:या पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पाच पंचमहाभूतांचा विसर मानवाला पडला आहे.
पेणमध्ये सारेच उतरले रस्त्यावर..
च्पेण : भारताचे लोहपुरुष आणि पहिले गृहमंत्री भारतर} सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती प्रीत्यर्थ संपूर्ण देशभरात राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने आज पेण प्रांत कार्यालयाच्या प्रमुख व उपजिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांत कार्यालय ते पेण एसटी आगार या पाचशे मीटर अंतरार्पयत एकता दौड व स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम सकाळी 11.क्क् ते 12.क्क् वाजता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाने एकत्रित होवून उत्साहात साजरा केला.
च्पेणच्या प्रांत अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आज सकाळी प्रांत कार्यालयाच्या दालनात पेण तहसीलदार सुकेशिनी पगारे, पेण नगर पालिका मुख्याधिकारी, पेण गटविकास अधिकारी के. बी. पाटील, गटशिक्षण अधिकारी खोडके, पेण पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी या प्रमुख शासकीय अधिका:यांसोबतीने पेणचे ग्रामसेवक, पेण नगरपरिषद कर्मचारी, अंगणवाडी सेविका महसूल कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कर्मचारी अशा तब्बल 7क्क् ते 8क्क् कर्मचारीवर्ग रॅलीमध्ये सहभागी झाला.
च्स्वच्छ भारत जनजागृती व्हावी. अस्वच्छतेचा अंमल दूर व्हावा. यासाठी सर्वाना राष्ट्रीय एकता व स्वच्छ भारत, सुंदर भारतासाठी शासनाच्या प्रत्येक कार्यालयाने अधिकारी वर्गाने, कर्मचारी वर्गाने नेहमी पुढे रहावे. आपले कार्यालयीन परिसर, आपले कार्यालये ही जनमानसाच्या आगमनाची दररोजची केंद्रस्थाने असल्याने येणा:या प्रत्येक नागरिकाने या स्वच्छतेचा अभियान वाटून येणारा जाणारा ग्रामस्थ तथा शहरी माणूस स्वच्छतेबाबत जागरुक राहील, समाजात आरोग्य नांदेल.
च् सकाळी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय एकता रॅलीत सहभागी झालेले शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध बँकांचे अधिकारी-कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, सरकारी अधिकारी व कर्मचारी व मोठय़ा प्रमाणात सहभागी झालेले श्री सदस्य नागरिक यांना सुरक्षा अबाधित राखण्याची शपथ दिली.
रायगड पोलिसांनी दिला एकतेचा संदेश
1अलिबाग : सरदार वल्लभभाई यांच्या 139 व्या जयंती दिनी रायगड पोलिसांनी एकता रॅली काढून जनतेमध्ये एकतेचा संदेश दिला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 139 व्या जयंती दिन हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून जाहीर केला आहे.
2अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावरुन रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये पोलीस दलातील जवान, आरसीएफ कंपनीतील जवान, एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्या हातामध्ये एकतेचा संदेश देणारे बॅनर होते, त्याचप्रामाणो एकतेच्या, समतेच्या घोषणाही देण्यात येत होत्या.
3शहरातील प्रमुख विभागातून रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आली. तेथे आल्यावर राष्ट्रगीताने रॅलीची करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी सुमंत भांगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक राजा पवार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
4रॅलीनंतर झालेल्या जाहीर सभेअंती वाटप करण्यात आलेल्या अल्पोपहाराच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणात कचरा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात होण्याची शक्यता होती, परंतु रॅलीत सहभागी प्रत्येकाने हा कचरा होणार नाही याची दक्षता घेतली आणि कागद व अन्य कचरा अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने ठेवलेल्या डस्टबीनमध्ये व्यवस्थितपणो टाकला.