कचरा गोळा करा, ५० रुपये मिळवा!

By Admin | Updated: March 5, 2015 01:46 IST2015-03-05T01:46:46+5:302015-03-05T01:46:46+5:30

कचरा वेळच्या वेळी उचलला जावा म्हणून आता कोकण रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वाढीव भत्ता देण्याचे ठरविले आहे.

Collect garbage, get 50 rupees! | कचरा गोळा करा, ५० रुपये मिळवा!

कचरा गोळा करा, ५० रुपये मिळवा!

मुंबई : ट्रेनमधील प्रवाशांची संख्या लक्षात घेता ट्रेनमध्ये मोठ्या
प्रमाणावर कचराही होतो आणि ट्रेन अस्वच्छ होते. हा कचरा वेळच्या वेळी उचलला जावा म्हणून आता कोकण रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वाढीव भत्ता देण्याचे ठरविले आहे. या योजनेअंतर्गत पॅन्ट्री कार चालकांना प्रति २0 किलो कचऱ्याच्या बॅगवर पन्नास रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे कोकण रेल्वेच्या धावत्या ट्रेनमध्ये निर्माण होणारा कचरा गोळा करण्यासाठी मिळेल, अशी आशा कोकण रेल्वेतर्फे करण्यात आली आहे. कोकणातल्या रेल्वेतील पॅन्ट्री कारमधील कर्मचारीच कचरा टाकत असल्याचे अनेकदा कोकण रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी सांगितले की, अशाप्रकारे जैविक आणि अजैविक कचरा वेगवेगळा गोळा केला जाईल. रत्नागिरी आणि मडगाव येथे या कचऱ्याची पर्यावरणपूरक पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी कोकण रेल्वे प्रत्येकी कचरा विघटन करण्याचे यंत्रसुद्धा बसविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Collect garbage, get 50 rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.