थंडीच्या आगमनाने रुग्ण वाढले

By Admin | Updated: December 1, 2014 22:56 IST2014-12-01T22:56:45+5:302014-12-01T22:56:45+5:30

डहाणू तालुक्यात नोव्हेंबरअखेरीस थंडीचे आगमन झाले असून दिवसेंदिवस हे प्रमाण वाढले आहे. पहाटेप्रमाणेच सायंकाळी वातावरणात विशेष गारवा जाणवत आहे.

Cold on the arrival of cold weather | थंडीच्या आगमनाने रुग्ण वाढले

थंडीच्या आगमनाने रुग्ण वाढले

बोर्डी : डहाणू तालुक्यात नोव्हेंबरअखेरीस थंडीचे आगमन झाले असून दिवसेंदिवस हे प्रमाण वाढले आहे. पहाटेप्रमाणेच सायंकाळी वातावरणात विशेष गारवा जाणवत आहे. परिणामी, सर्दी, खोकला, कफ, घसा, डोके व सांधेदुखीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
काही वर्षांपूर्वी दिवाळी कालावधीत जाणवणाऱ्या थंडीचे या वर्षी नोव्हेंबरअखेरीस आगमन झाले आहे. तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यालगत गावांमध्ये पहाटे आणि संध्याकाळी वातावरणात गारव्याचे अधिक प्रमाण जाणवत आहे. सायंकाळी ४ ते सकाळी १० वाजेपर्यंत थंडीची हुडहुडी कायम असते. त्यामुळे सर्वत्र गरम कपडे परिधान केलेले आणि शेकोटीभोवती बसलेले नागरिक दृष्टीस पडत आहेत. वातावरणातील थंडीमुळे सर्दी, कफ, खोकला, घसा, डोके व अंगदुखीच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये मुलांचे प्रमाण अधिक असून ज्येष्ठ नागरिकांना सांधेदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. रविवारी सरकारी व खाजगी दवाखाने बंद असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल झाले. (वार्ताहर)

Web Title: Cold on the arrival of cold weather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.