Join us  

अवघ्या पाच हजार रुपयांत कोकेन तस्कराने ओलांडली भारताची सीमा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 3:12 AM

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने १५ जुलै रोजी आफ्रिकन रहिवासी असलेले एनवूड (३५) याला बेड्या ठोकल्या

मुंबई : सहा कोटींच्या कोकेन तस्करीप्रकरणी अटकेत असलेल्या बोनाव्हेचूर एनवूड (३५) याने बांगलादेशमार्गे या कोकेनची तस्करी केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या ५ हजार रुपयांत त्याने बांगलादेशातून भारताची सीमा अवैधरीत्या ओलांडली. पुढे पोटात दीड किलो कोकेन दडवून तीन दिवस रेल्वेचा प्रवास करत, मुंबई गाठल्याची माहिती आतापर्यंतच्या तपासात समोर आली आहे. त्यामुळे या जीवघेण्या बदललेल्या नव्या मार्गामुळे सुरक्षा यंत्रणाही चक्रावल्या आहेत.

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने १५ जुलै रोजी आफ्रिकन रहिवासी असलेले एनवूड (३५) याला बेड्या ठोकल्या. त्याने तपास यंत्रणांना दिलेल्या माहितीत, त्याच्या साथीदाराने कोकेनचा साठा पोटात दडवून दिल्ली विमानतळावर उतरला. पुढे हा साठा आपल्याला दिल्याचे सांगितले. मात्र, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे शिवदीप लांडे यांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत, त्याने बांगलादेशमार्गे हा साठा मुंबईत आणल्याचे समोर आले. त्याच्या पासपोर्टवरून तो १७ वर्षांनी भारतात आल्याचे स्पष्ट झाले. त्यातही तो बांगलादेशच्या ढाका विमानतळावर उतरल्याचे समजताच तपास पथकाने त्याच्याकडे उलटतपासणी सुरू केली.तेव्हा तपासात त्याने दीड किलो कोकेनच्या गोळ्या गिळून पोटात दडवल्या. त्याने आफ्रिकेतूनच या कोकेनचा साठा आणला होता. मुंबईसह तैवानमध्ये कोकेनचा साठा पुरविण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.पुढे ढाका विमानतळावर उतरल्यानंतर त्याने पाच हजार रुपयांत बांगलादेशातून भारताची सीमा ओलांडली आणि तो आसाममध्ये आला. तेथून हावडामार्गे तीन दिवस लोकलने प्रवास करत मुंबई गाठल्याचे सांगितले.भेसळ करून विकण्याची योजनाच्अनेकदा विमानतळावर पोटात दडवलेल्या कोकेनच्या गोळ्या अन्य साथीदारांकडे सोपवून पुढचा पल्ला गाठला जातो. शिवाय पोटात कॅप्सूल ठेवून लांबच्या प्रवासाने जीवही जाण्याची भीती असते. मात्र, एनवूडने एवढा मोठा धोका का पत्करला, याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे एएनसीने सांगितले. मुंबईत याच साठ्यात भेसळ करत तो विकणार होता.च्त्याच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, बांगलादेश कोकेन तस्करीसाठी डोके वर काढत असल्याचे दिसून आले. लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एनवूडकडे कसून चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्याच्या चौकशीतून आणखीन अटकेची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :अमली पदार्थगुन्हेगारी