कोस्टल रोडच्या बोगद्याचे काम ऑक्टोबरपासून; महापालिकेचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 01:44 IST2020-09-11T01:44:42+5:302020-09-11T01:44:54+5:30

मुंबईकरांचा प्रवास जलद करण्यासाठी महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे.

Coastal Road tunnel work from October; | कोस्टल रोडच्या बोगद्याचे काम ऑक्टोबरपासून; महापालिकेचे नियोजन

कोस्टल रोडच्या बोगद्याचे काम ऑक्टोबरपासून; महापालिकेचे नियोजन

मुंबई : कोस्टल रोडसाठी प्रिंन्सेस स्ट्रीट ते वरळी सी-लिंकपर्यंतच्या ९.९८ कि.मी.च्या मार्गात असणारा एकूण ३.४५ कि.मी.चा बोगदा खोदला जाणार आहे. मात्र कोरोना काळात लांबणीवर पडलेले हे काम आॅक्टोबर महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी आठ ते दहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

मुंबईकरांचा प्रवास जलद करण्यासाठी महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम १३ आॅक्टोबर २०१८ पासून सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, पर्यावरणप्रेमी, कोळी बांधवांच्या विरुद्ध आणि न्यायालयीन प्रक्रियांमुळे हे काम काही काळ बंद होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने १७ डिसेंबर २०१९ रोजी कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती उठवली. त्यामुळे सहा महिन्यांपासून बंद असलेले काम १८ डिसेंबर २०१९ पासून पुन्हा तातडीने सुरू करण्यात आले. कोरोना काळात मनुष्यबळ नसल्याने मंदावलेले कोस्टल रोडचे काम आता पुन्हा वेगाने सुरू झाले आहे.

आतापर्यंत केवळ १६ टक्के काम पूर्ण झाले आहे. जुलै २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आता महापालिकेने ठेवले आहे. कोस्टल रोडसाठी चीनमधून आयात करण्यात आलेल्या २२०० टन वजनाच्या मशीनद्वारे ३.४५ कि.मी.चा बोगदा खोदला जाणार आहे. ही मशीन एप्रिलमध्येच मुंबईत दाखल झाली असून २५ आॅक्टोबरपासून कामाला सुरुवात होणे अपेक्षित आहे. मुंबई मेट्रो प्रकल्पावर काम करणारे चीनचे तज्ज्ञ यासाठी महापालिकेला मदत करणार आहेत.

च्कोस्टल रोडमुळे प्रिंन्सेस स्ट्रीट या मुंबईच्या दक्षिण टोकापासून थेट वांद्र्यापर्यंत मुंबईकरांना टोल-फ्री रस्त्यावरून सुसाट प्रवास करता येणार आहे. च्मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून वेळेची ७० टक्के आणि इंधनाची ३४ टक्के बचत होणार आहे. तसेच ध्वनी आणि वायुप्रदूषणाचे प्रमाणही कमी होणार आहे, असे दावा पालिका प्रशासन करीत आहे. च्कोस्टल रोडचे काम चार वर्षांत म्हणजेच २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले होते. मात्र अनेक कारणांमुळे या प्रकल्पाचे काम १५४ दिवस रखडले होते.

Web Title: Coastal Road tunnel work from October;