मुंबई, ठाण्यावर ‘सीएनजी’टंचाईचे महासंकट

By Admin | Updated: October 29, 2014 02:52 IST2014-10-29T02:52:02+5:302014-10-29T02:52:02+5:30

मुंबईतील सीएनजी पंपांवर संक्रांत आली असून, 139 सीएनजी पंपांपैकी 1क्7 पंपांकडे ‘टाईप अप्रूव्हल’ हे प्रमाणपत्र नसल्याने वैध मापन शा यंत्रणोने पंप बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे.

CNG's catastrophic crash at Thane | मुंबई, ठाण्यावर ‘सीएनजी’टंचाईचे महासंकट

मुंबई, ठाण्यावर ‘सीएनजी’टंचाईचे महासंकट

चेतन ननावरे - मुंबई 
मुंबईतील सीएनजी पंपांवर संक्रांत आली असून, 139 सीएनजी पंपांपैकी 1क्7 पंपांकडे ‘टाईप अप्रूव्हल’ हे प्रमाणपत्र नसल्याने वैध मापन शा यंत्रणोने पंप बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. मुंबईनंतर कारवाईचा पुढचा टप्पा ठाणो, नवी मुंबई व रायगड असल्याने येथील सीएनजी पंपांवरही कारवाईची टांगती तलवार आहे. त्यामुळे सीएनजीटंचाईचे महासंकट ओढवण्याची शक्यता आहे. सर्वच पंप बंद केल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प होऊन मुंबई ठप्प पडण्याची भीती आहे.
याबाबत मुंबई पेट्रोलपंप डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवी शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक सीएनजी पंपाला शासनाचे टाईप अप्रूव्हल हे प्रमाणपत्र घेणो बंधनकारक असते. मात्र गेल्या 1क् ते 12 वर्षापासून महानगर गॅस कंपनीमार्फत सुरू असलेल्या 139 सीएनजी पंपांमधील केवळ 32 पंपांचे प्रमाणपत्र घेतले आहे. परिणामी वैध मापन शा यंत्रणोच्या नवनियुक्त नियंत्रकांनी प्रमाणपत्र नसलेल्या पंपांवर कारवाई सुरू केली आहे. यासंदर्भात संघटनेने महानगर कंपनीकडे धाव घेतली असता लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे. शिवाय कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी बुधवारी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव दीपक कपूर यांच्यासोबत तातडीच्या बैठकीस वेळ मागितली आहे. या बैठकीनंतरच काहीतरी तोडगा निघेल, अशी अपेक्षाही शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

 

Web Title: CNG's catastrophic crash at Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.