Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा रशिया दौरा पुरामुळे रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 04:30 IST

राज्यातील पूरस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार १२ आॅगस्टपासून सुरु होणारा रशिया दौरा रद्द केला

मुंबई: राज्यातील पूरस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार १२ आॅगस्टपासून सुरु होणारा रशिया दौरा रद्द केला असून आता केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल त्या दौऱ्यात राज्याचे प्रतिनिधित्व करतील, असे राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.गोयल यांच्यासह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा आणि गोवा या पाच राज्यांचे मुख्यमंत्री यांचे एक शिष्टमंडळ रशियातील व्लादिवोस्तोक येथे जात आहे. फडणवीस वगळून इतर सर्वजण रवाना झाले आहेत. रशियाच्या अतिपूर्वेकडील राज्यांशी व्यापारविषयक भागिदारी आणि खास करून पायाभूत सुविधांसाठी तेथून गुंतवणूक मिळविणे यासाठी हे शिष्टमंडळ गेले आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस