Join us

साडेसात लाखांचं पाणी बिल थकवलं; मुख्यमंत्र्यांचा बंगला दिवाळखोर यादीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 08:28 IST

आरटीआयमधून माहिती समोर

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्याचा समावेश मुंबई महापालिकेनं दिवाळखोर यादीत केला आहे. पाण्याचं बिल थकवण्यात आल्यानं पालिकेनं वर्षा बंगल्याचा समावेश डिफॉल्टर यादीत केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचं 7 लाख 44 हजार 981 रुपयांचं बिल थकल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनीदेखील पाण्याचं बिल थकवलं आहे. एकूण 18 मंत्र्यांनी पाण्याचं बिल भरलेलं नाही. या बिलाची एकूण रक्कम 8 कोटींच्या घरात जाते. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी आरटीआयमधून ही माहिती मिळवली. सर्वसामान्यांनी काही शे रुपयांचं बिल थकवल्यावर पालिकेकडून तातडीनं कारवाई केली जाते. मात्र मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री लाखोंचं बिल थकवत असताना त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोणी किती रुपयांचं बिल थकवलं?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वर्षा निवासस्थानएकूण थकबाकी ७ लाख ४४ हजार, ९८१ रूपये

सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री, देवगिरी निवासस्थानथकबाकी- १ लाख ६१ हजार ५५ रुपये

विनोद तावडे, सांस्कृतिक मंत्री, सेवासदन निवासस्थानथकबाकी- १ लाख ६१ हजार, ७१९ रुपये

पंकजा मुंडे, महिला आणि बालविकास मंत्री, रॉयलस्टोन निवासस्थानथकबाकी ३५ हजार ३३ रुपये

दिवाकर रावते, परिवहन मंत्री, मेघदूत निवासस्थानथकबाकी १ लाख ५ हजार ४८४ रुपये

सुभाष देसाई, उद्योगमंत्री, पुरातन निवासस्थानथकबाकी २ लाख ४९ हजार २४३ रुपये

एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम, नंदनवन निवासस्थानथकबाकी २ लाख २८ हजार ४२४ रुपये

चंद्रशेखर बावनकुळे, उर्जामंत्री, जेतवन निवासस्थानथकबाकी ६ लाख, १४ हजार ८५४ रुपये

महादेव जानकर, पशुसंवर्धन मंत्री, मुक्तागिरी निवासस्थानथकबाकी १ लाख ७३ हजार ४९७ रुपये

ज्ञानेश्वरी निवासस्थानथकबाकी ५९ हजार ७७८ रुपये

सह्याद्री अतिथीगृहथकबाकी १२ लाख, ४ हजार ३९० रूपये 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमुंबई महानगरपालिका