लालबाग राजाच्या दर्शनरांगेत गोंधळ
By Admin | Updated: August 31, 2014 02:49 IST2014-08-31T02:49:37+5:302014-08-31T02:49:37+5:30
पोलिसांनी गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्याची सूचना करूनही लालबागच्या राजाच्या दर्शनात गोंधळ उडाला.

लालबाग राजाच्या दर्शनरांगेत गोंधळ
मुंबई : पोलिसांनी गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्याची सूचना करूनही लालबागच्या राजाच्या दर्शनात गोंधळ उडाला. शनिवारी 4 वाजण्याच्या सुमारास कार्यकर्ते आणि भाविकांमध्ये बाचाबाची झाली. मात्र या वेळी राग अनावर झालेल्या गर्दीसमोर पोलिसांना हतबल व्हावे लागले.
लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी भक्त तासन्तास उभे असताना, राजाच्या कार्यकत्र्यानी अचानक रांगेत नसलेल्या भाविकांना दुस:या बाजूने दर्शनाला सोडण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक तास प्रामाणिकपणो रांगेत उभे असलेले भाविक संतापले. तर काहींनी मुख्य रांग सोडून कार्यकत्र्यानी तयार केलेल्या मार्गाभोवती एकच गर्दी केली. या गर्दीला मात्र कार्यकत्र्यानी बाहेरच रोखून धरले. यावरून भाविक आणि कार्यकत्र्यामध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. वाद एवढा वाढला की पोलीसही हतबल झाले.
आम्ही लांबून आलो आहोत. मुखदर्शनासाठी मोठी रांग असूनही आम्ही मध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला नाही. उलट प्रामाणिकपणो रांगेत उभे राहिलो. सात तास झाले तरी अद्याप दर्शन मिळालेले नाही. पुढल्या चार तासांतही दर्शन होईल, असे वाटत नाही. मात्र काही ठरावीक व्यक्तींना मधूनच थेट दर्शनासाठी पाठविण्यास आम्हाला आक्षेप आहे, अशी चर्चा संतापलेल्या गर्दीतून व्यक्त होत होती.
राजाच्या दर्शनात गोंधळ होण्याची ही पहिलीच घटना नव्हे. मात्र मंडळाने ‘मॉब मॅनेजमेंट’च्या दृष्टिकोनातून पावले उचलली पाहिजेत. मंडळाच्या कार्यकत्र्याच्या वागणुकीवरही र्निबध घालणो गरजेचे आहे. जेणोकरून, गणोशोत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये याची दक्षता घेतली पाहिजे, असेही गर्दीतील काहींनी सांगितले. याबाबत मंडळाचे अध्यक्ष अशोक पवार यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. (प्रतिनिधी)