मुंबईत राहणार ढगाळ वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 05:58 IST2018-05-19T05:58:41+5:302018-05-19T05:58:41+5:30

केरळमध्ये २९ मे रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असतानाच शनिवारसह रविवारी मुंबईमधील वातावरण ढगाळ राहील.

A cloudy atmosphere in Mumbai | मुंबईत राहणार ढगाळ वातावरण

मुंबईत राहणार ढगाळ वातावरण

मुंबई : केरळमध्ये २९ मे रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असतानाच शनिवारसह रविवारी मुंबईमधील वातावरण ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २८ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. तर १९ ते २० मे दरम्यान विदर्भात उष्णतेची तीव्र लाट येईल. १९ मे रोजी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल.

Web Title: A cloudy atmosphere in Mumbai