तोकडय़ा कपडय़ातील गणोशभक्तांना रोखले
By Admin | Updated: September 4, 2014 02:55 IST2014-09-04T02:55:47+5:302014-09-04T02:55:47+5:30
अंधेरीचा राजा मंडळाने घालून दिलेला ड्रेस कोड न पाळल्याने आतार्पयत 15 गणोशभक्तांना प्रवेश नाकारण्याचा प्रकार घडला आहे.

तोकडय़ा कपडय़ातील गणोशभक्तांना रोखले
मुंबई : तोकडे कपडे, मिनी स्कर्ट आणि स्लिव्हलेस पेहराव करणा:या आणि अंधेरीचा राजा मंडळाने घालून दिलेला ड्रेस कोड न पाळल्याने आतार्पयत 15 गणोशभक्तांना प्रवेश नाकारण्याचा प्रकार घडला आहे. आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीच्या या फतव्याच्या मनमानीची यंदाही चर्चा रंगली आहे.
आतार्पयत अंधेरीचा राजाच्या दर्शनाला तोकडय़ा कपडय़ांमध्ये आलेल्या 15 जणांना दर्शनापासून रोखण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. मंडळाने सांगितलेला ड्रेस कोड मोडणा:या या सगळ्य़ांना पुन्हा कपडे बदलून येण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना प्रवेश दिल्याचे मंडळातर्फे खजिनदार सुबोध चिटणीस यांनी सांगितले. मंडळाने यापूर्वीच ड्रेस कोडची माहिती दिली असल्याने अनेकांनी आधीच त्याचे पालन केल्याचेही या मंडळाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
या मंडळात पावित्र्य आणि संस्कृती जपण्याच्या नावाखाली 2क्12 साली अंधेरीचा राजाच्या दर्शनासाठी ड्रेस कोड लागू केला होता. तेव्हाही या प्रकाराची भरपूर चर्चा झाली होती. गेल्या वर्षी तर तोकडय़ा कपडय़ातील तब्बल 2क्क् गणोशभक्तांना अंधेरीचा राजाच्या दर्शनापासून रोखण्यात
आले होते. (प्रतिनिधी)