दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ आज बंद
By Admin | Updated: November 7, 2014 01:11 IST2014-11-07T01:11:20+5:302014-11-07T01:11:20+5:30
जवखेडा तालुक्यातील पाथर्डी येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ उद्या नवी मुंबई बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ आज बंद
नवी मुंबई : जवखेडा तालुक्यातील पाथर्डी येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ उद्या नवी मुंबई बंदचे आवाहन करण्यात आले आहे. नवी मुंबई आरपीआयच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला असून या बंदला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविल्याची माहिती आरपीआयचे अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी दिली.
पाथर्डी हत्याकाडांच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. या घटनेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नवी मुंबई आरपीआयच्या वतीने (आठवले गट) उद्या शहरात शांततामय बंद पुकारण्यात आल्याचे ओहोळ यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)