खारघर टेकडी पर्यटकांसाठी बंद

By Admin | Updated: June 29, 2015 23:10 IST2015-06-29T23:10:12+5:302015-06-29T23:10:12+5:30

पावसाळ्यात खारघर टेकडीवर होणाऱ्या दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असते.

Closed for visitors to Kharghar hill | खारघर टेकडी पर्यटकांसाठी बंद

खारघर टेकडी पर्यटकांसाठी बंद

पनवेल : पावसाळ्यात खारघर टेकडीवर होणाऱ्या दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असते. या दुर्घटना टाळण्यासाठी सिडको प्रशासनाने ३० सप्टेंबरपर्यंत खारघर टेकडीवर पर्यटकांसाठी प्रवेश बंद केला आहे. मात्र टेकडीवरील चाफेवाडी, फणसवाडी येथील गावकऱ्यांना यामधून सूट असणार आहे.
नवी मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात खारघर टेकडी हे ठिकाण निसर्गाच्या सान्निध्यात आहे. विशेष म्हणजे या ठिकाणाहून संपूर्ण नवी मुंबई शहराचे विहंगम दृश्य पाहावयास मिळते. सिडकोने याठिकाणी जाण्यासाठी डांबरी रोड, पथदिवे देखील बसविले आहेत. शहरामधील अनेक नागरिक या ठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येतात. मात्र पावसाळ्यात दरडी कोसळण्यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळेच सिडकोने या ठिकाणी प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिडकोने याठिकाणी सहा सुरक्षारक्षक देखील नेमले आहेत. मात्र काही अतिउत्साही पर्यटक सुरक्षारक्षकांना न जुमानता टेकडीवर जातात, अशा पर्यटकांना रोखण्यासाठी सिडकोच्या वतीने खारघर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून बंदोबस्ताची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार खारघर पोलीस ठाण्याच्या वतीने या ठिकाणी दोन पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत.
शनिवारी, रविवारी या टेकडीवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळते. तरु णांचा यामध्ये मोठ्याप्रमाणात सहभाग असतो. मात्र पर्यटकांनी याठिकाणी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सिडकोचे खारघरमधील प्रशासक प्रदीप डहाके यांनी केले आहे.

Web Title: Closed for visitors to Kharghar hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.