बंद पडलेले दूरध्वनी तातडीने सुरु होणार
By Admin | Updated: December 15, 2014 23:43 IST2014-12-15T23:43:20+5:302014-12-15T23:43:20+5:30
गेल्या काही दिवसांपासून बी.एस.एन.एल.चे दूरध्वनी डोंबिवली व कल्याण शहरात बंद पडल्याच्या तक्रारी येत होत्या. त्याची दाखल घेवून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी

बंद पडलेले दूरध्वनी तातडीने सुरु होणार
डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून बी.एस.एन.एल.चे दूरध्वनी डोंबिवली व कल्याण शहरात बंद पडल्याच्या तक्रारी येत होत्या. त्याची दाखल घेवून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी आणि बी.एस.एन.एल.चे अधिकारी यांची तातडीने संयुक्त बैठक मध्यवर्ती शहर कार्यालयात आयोजित केली होती.
या बैठकीस बी.एस.एन.एल.चे महाव्यवस्थापक डी.जी.कुलकर्णी , डी.जी.एम. वी.एम.सावदेकर (डोंबिवली) तसेच महापालिकेकडून शहर अभियंता, प्रकल्पप्रमुख प्रमोद कुलकर्णी आदी उपस्थित होते. या बैठकीत शिंदेंनी दूरध्वनी बंद असल्यामुळे डोंबिवली व कल्याणमधील ग्राहकांना होत असलेल्या मनस्तापाबद्दल, आणि यात तातडीने मार्ग काढण्यासाठी आपापले म्हणणे मांडण्यास सांगितले. त्यानुसार बी.एस.एन.एल.तर्फे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे चालू असलेल्या कामांमुळे दूरध्वनी वाहिन्या तुटल्यामुळे हे दूरध्वनी बंद असल्याचे सांगितले. त्यावर कुलकर्णी यांनी बी.एस.एन.एल.ने पूर्वी अस्ताव्यस्तपणे वाहिन्या टाकल्यामुळे प्रत्येक ठिकाणी या वाहिन्या कुठे आहेत त्याचा अंदाज काम करताना येणे कठीण असल्यामुळे समस्या उद्भवल्याचे सांगितले. त्यानंतर आयुक्त रामनाथ सोनावणे यांचे बरोबर मोबाईलद्वारे चर्चा केली. डॉ.शिंदेंनी ‘ब्लेम गेम न’ करता आपापली जबाबदारी उचलावी असे सांगितले़ त्यानुसार आता ज्या वाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत त्या तातडीने जोडण्यात याव्यात असे बी.एस.एन.एल.च्या अधिका-यांना सांगितले.
कुलकर्णी यांनीही सदर कामे करत असलेल्या ठेकेदारांना बोलावून त्यांना सक्त ताकीद द्यावी व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जे रस्ते भविष्यात खोदणार आहे त्याची पूर्व सूचना लिखित स्वरुपात बी.एस.एन.एल. व एम.एस.सी.बी.यांना द्यावी व त्याची एक प्रत खासदार कार्यालयात द्यावी असे सुचविले. त्याचप्रमाणे भविष्यकाळातील रस्त्यांचे काम करताना रस्त्याच्या दुतर्फा सदर वाहिन्या टाकण्यासाठी जागा सोडावी यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला देय असलेल्या रकमेबाबतचे पत्र शिवाय बी.एस.एन.एल. व एम.एस.सी.बी.ला द्यावे त्यानुसार बी.एस.एन.एल. व एम.एस.इ.बी. यांनी आपल्या खात्याची परवानगी मिळण्यासाठी पाठवावी असेही ठरले.