पाण्याची हजारो मीटर बंद

By Admin | Updated: June 30, 2014 23:27 IST2014-06-30T23:27:18+5:302014-06-30T23:27:18+5:30

भाईंदर महापालिकेचे एक मुख्य महसूल स्त्रोत असलेले पाणीबिल दर्शविणारी पाण्याची हजारो मीटर बंद असल्याचे उघडकीस आले आहे.

Close the thousands of meters of water | पाण्याची हजारो मीटर बंद

पाण्याची हजारो मीटर बंद

>मीरा रोड : भाईंदर महापालिकेचे एक मुख्य महसूल स्त्रोत असलेले पाणीबिल दर्शविणारी पाण्याची हजारो मीटर बंद असल्याचे उघडकीस आले आहे. तसेच दुरुस्तीची प्रयोगशाळा शहरातच सुरू  करण्याचा  महासभेत मंजूर झालेला प्रस्ताव गेले सहा वर्षे बासनात बांधलेला आहे. 
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला लागूनच असलेले मीरा-भाईंदर शहर 15 वर्षात झपाटय़ाने वाढले. 79.4क् चौकिमी. पसरलेल्या या शहरात शहरी, ग्रामीण तसेच सागरी भागसुद्धा येतो. 2क्11 च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या 8 लाख 14 हजार 655 असली तरी प्रत्यक्षात 1क् लाखांर्पयत पोहोचली आहे. 
महापालिकेचे  घरपट्टी आणि पाणीपट्टी हे दोन प्रमुख महसूल सोत्न आहेत. शहरात 3क् हजार 919 निवासी तर 2762 औद्योगिक अशी 33 हजार 681 नळजोडण्याची मीटर आहेत़ त्यातील 2क् टक्के नळजोडण्याची मीटर काम करीत नसल्यामुळे बंद आहेत. अशी मीटर दुरुस्तीसाठी मुंबई किवा ठाणो येथे पाठवावी लागतात ती दुरुस्त होऊन येण्यासाठी 15 दिवस लागतात. त्यामुळे शहरातच मीटर तपासणीची प्रयोगशाळा सुरू करावी, असा प्रस्ताव मीरा-भाईंदर महापालिकेने 2क्क्8 मध्ये मंजूर केला आहे. परंतु प्रत्यक्षात मात्न आजर्पयत याबाबत काहीच पावले उचलली गेली नाहीत. शहराच्या लोकसंख्येनुसार 155 एमएलडी पाण्याची गरज असताना शहरात मात्न 116 एमएलडी. पाणी उपलब्ध आहे. पाणी योजनेसाठी केंद्र शासनाच्या  जेएनएनयूआरएम  योजनेचा फायदा उचलण्यासाठी महापालिका अयशस्वी ठरली आहे.
याबाबत पालिकेच्या पाणी विभागाचे कार्यकरी अभियंता सुरेश वाकोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शहरातील बंद असलेल्या  पाणीमीटरधारकांना त्यांनी आपले मीटर त्वरित दुरुस्त  किंवा बदली करावे, अशी नोटीस पाठवल्याचे सांगितले. (वार्ताहर)
 
च्मीटर दुरुस्तीसाठी मुंबई किंवा ठाण्यात पाठवली जातात.  मीटर तपासणीची प्रयोगशाळा सुरू करावी, असा प्रस्ताव मीरा-भाईंदर पालिकेने 2क्क्8 मध्ये मंजूर केला. परंतु प्रत्यक्षात याबाबत काहीच पावले उचलली गेली नाहीत. 

Web Title: Close the thousands of meters of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.