उद्या काही बँका बंद!

By Admin | Updated: September 1, 2015 01:41 IST2015-09-01T01:41:23+5:302015-09-01T01:41:23+5:30

देशातील प्रमुख ११ केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या सार्वत्रिक संपामध्ये बँक कर्मचाऱ्यांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या संपादिवशी २५ सहकारी,

Close some banks tomorrow! | उद्या काही बँका बंद!

उद्या काही बँका बंद!

मुंबई : देशातील प्रमुख ११ केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या सार्वत्रिक संपामध्ये बँक कर्मचाऱ्यांनीही उडी घेतली आहे. त्यामुळे २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या संपादिवशी २५ सहकारी, ११ खाजगी आणि ८ विदेशी बँका एक दिवसासाठी बंद राहणार आहेत.
सरकारमार्फत कामगार कायद्यात बदल केले जात असल्याच्या निषेधार्थ देशातील केंद्रीय कामगार संघटनांनी
२ सप्टेंबरला सार्वत्रिक संपाची हाक दिली आहे. त्यासंदर्भात कामगार संघटना संयुक्त कृती समितीने सोमवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी बँक कर्मचाऱ्यांचे नेते विश्वास उटगी यांनी सार्वत्रिक संपाला पाठिंबा घोषित करत संपात सक्रिय सामील होणार असल्याचे सांगितले. उटगी म्हणाले की, सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परिणामी, बँक कर्मचारी संघटना कृती समितीच्या पाठीशी आहेत. संपादिवशी धनादेश किंवा रोख असे कोणतेही व्यवहार कर्मचारी होऊ देणार नाहीत. सकाळी ११.३० वाजता आझाद मैदानावर निदर्शने करून कर्मचारी रोष व्यक्त करतील.
कृती समितीचे निमंत्रक ए.डी. गोलंदाज म्हणाले की, बँक कर्मचाऱ्यांसह गिरणी कामगार, घरकामगार आणि विविध क्षेत्रातील कामगार संघटनांनी संपात सामील होण्याची घोषणा केली आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या कार्यालयातील कर्मचारी संपात दिसतील तर कंत्राटी कामगारांनीही संपात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Close some banks tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.