क्लीनअप मार्शल महिलेच्या डोक्यात घातला पेव्हर ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:18 IST2020-12-04T04:18:18+5:302020-12-04T04:18:18+5:30

विनामास्क फिरणाऱ्या महिलेला हटकल्याचा राग, तिघांना अटक क्लीनअप मार्शल महिलेच्या डोक्यात घातला पेव्हर ब्लॉक विनामास्क फिरणाऱ्या महिलेला हटकल्याचा राग, ...

Cleanup Marshal lays paver block on woman's head | क्लीनअप मार्शल महिलेच्या डोक्यात घातला पेव्हर ब्लॉक

क्लीनअप मार्शल महिलेच्या डोक्यात घातला पेव्हर ब्लॉक

विनामास्क फिरणाऱ्या महिलेला हटकल्याचा राग, तिघांना अटक

क्लीनअप मार्शल महिलेच्या डोक्यात घातला पेव्हर ब्लॉक

विनामास्क फिरणाऱ्या महिलेला हटकल्याचा राग, तिघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भांडुप स्टेशन परिसरात विनामास्क फिरणाऱ्यांंविरुद्ध कारवाई करत असताना, विनामास्क फिरणाऱ्या महिलेकड़ून क्लीनअप मार्शल महिलेच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घातल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी तीन महिलांना अटक केली आहे.

वागळे इस्टेट परिसरात राहणाऱ्या दर्शना चौहान (२७) यात जखमी झाल्या आहेत. त्या पालिकेने नेमून दिलेल्या पथकामध्ये कंत्राट पद्धतीने क्लीनअप मार्शल म्हणून काम करतात. बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास भांडुप स्टेशनजवळील मोतीबाई वाडी परिसरात विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध त्या कारवाई करत होत्या. त्याच दरम्यान रोहिणी सुरेश दोदे (२८) नावाची महिला विनामास्क दिसल्याने तिला हटकले आणि रोहिणीला मास्क घालण्यास सांगितले. मात्र रोहिणीने मास्क घालण्याऐवजी दर्शना यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली तसेच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

नंतर त्या महिलेला शिवी देऊ नका, असे सांगताच, रोहिणी आणि तिच्यासोबत असणाऱ्या शोभा सुरेश दोदे (५०) आणि सीमा सतीश भंडारे (४०) यांनीही मारहाण सुरू केली. रोहिणीने जवळील पेव्हर ब्लॉक दर्शनाच्या डोक्यात घातला. घटनास्थळी महिला पोलीस दाखल होताच त्यांनी दर्शना यांना तत्काळ अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्या डोक्याला चार टाके बसले आहेत. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करत, तिन्ही महिलांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या तीनही महिला घरकाम करतात. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती भांडुप पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Cleanup Marshal lays paver block on woman's head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.