सफाई कामगारांनाही ‘इलेक्शन डय़ूटी’
By Admin | Updated: October 3, 2014 23:05 IST2014-10-03T23:05:34+5:302014-10-03T23:05:34+5:30
विधानसभा निवडणुकीच्या कामात कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बहुतांश कर्मचारी व्यस्त असताना अंतिम टप्प्यात येथील सफाई कामगारांनाही त्यासाठी नेमण्यात येणार आहे.

सफाई कामगारांनाही ‘इलेक्शन डय़ूटी’
>कल्याण : विधानसभा निवडणुकीच्या कामात कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बहुतांश कर्मचारी व्यस्त असताना अंतिम टप्प्यात येथील सफाई कामगारांनाही त्यासाठी नेमण्यात येणार आहे. परिणामी, शहरातील कचरा आणि गटारसफाईच्या दैनंदिन कामावरही आता परिणाम होण्याची शक्यता आहे.
केडीएमसी क्षेत्रतून प्रतिदिन सरासरी 55क् टन कचरा गोळा केला जातो. महापालिकेचे 7 प्रभाग असून यातील ह आणि ड या दोन प्रभागांत खाजगी ठेकेदारामार्फत कचरा उचलला जातो. उर्वरित प्रभागांमध्ये मात्र पालिकेच्या सफाई कर्मचा:यांमार्फतच कचरा उचलला जात आहे. केडीएमसीच्या विविध आस्थापनांमध्ये एकूण साडेचार हजार कर्मचारी आहेत. यात घनकचरा व्यवस्थापन विभागात 2284 कामगार आहेत़ यातील सफाई कामगारांपैकी 19क्9 कामगार दैनंदिन सफाईकरिता कार्यरत आहेत. त्यांच्याकडून कचरा उचलणो, गटारे आणि रस्तासफाईची कामे करून घेण्यात येतात.एप्रिल-मे महिन्यांत पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीदेखील 9क्क् सफाई कर्मचा:यांना निवडणूककामी जुंपण्यात आले होते.
विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी आधीच केडीएमसीचा 8क् ते 9क् टक्के कर्मचारीवर्ग घेतला असताना निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील कामासाठी 14 ते 16 ऑक्टोबर 2क्14 या कालावधीत सफाई कामगारांची नेमणूक करण्यात येणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून याकामी 3 दिवस हे सफाई कामगार व्यस्त राहणार आहेत.
निवडणुकीचे काम राष्ट्रीय कर्तव्य असून महसूल विभागाने केलेल्या मागणीनुसार पालिकेचे कर्मचारी त्यांना दिलेले आहेत़ सफाई कर्मचा:यांचे काम निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आह़े त्या कालावधीत पर्यायी व्यवस्था करण्याचा आमचा प्रय} असल्याने दैनंदिन सफाइवरच्या परिणाम होणार नाही.
- रामनाथ सोनवणो,
आयुक्त, केडीएमसी