मरेची संसदीय समितीसमोर ‘सफाई’

By Admin | Updated: January 16, 2016 01:46 IST2016-01-16T01:46:33+5:302016-01-16T01:46:33+5:30

मुंबई भेटीवर आलेल्या पार्लमेन्ट पब्लिक अकाऊंट कमिटीने (संसदीय समिती)शुक्रवारी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. स्थानकांवर असलेल्या अस्वच्छतेवरुन

'Cleanliness' before Murari parliamentary committee | मरेची संसदीय समितीसमोर ‘सफाई’

मरेची संसदीय समितीसमोर ‘सफाई’

मुंबई : मुंबई भेटीवर आलेल्या पार्लमेन्ट पब्लिक अकाऊंट कमिटीने (संसदीय समिती)शुक्रवारी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. स्थानकांवर असलेल्या अस्वच्छतेवरुन समितीच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे मध्य रेल्वेला याबाबत ‘सफाई’द्यावी लागली. पार्लमेन्ट पब्लिक अकाऊंट कमिटीचे काही सदस्य हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या कमिटीत खासदारांचा समावेश असतो. कमिटीकडून रेल्वेच्या विविध विभागांचा आढावा घेतला जातो. यावेळी मुंबई दौऱ्यावर येताच त्यांनी मध्य रेल्वेच्या अकाऊंट विभागाची माहीती घेतली.
अन्य स्थानकांचा विसर
सीएसटी वगळता सदस्यांनी मध्य रेल्वेच्या अन्य स्थानकांची पाहणी मात्र केली नाही. अन्य स्थानकांवर नेमकी स्थिती काय आहे,हे त्यांनी पाहिले नाही अशी टिका रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी केली.

Web Title: 'Cleanliness' before Murari parliamentary committee