सफाई, वैद्यकीय सेवेची ऐशी-तैशी
By Admin | Updated: February 8, 2015 22:56 IST2015-02-08T22:56:21+5:302015-02-08T22:56:21+5:30
वसई विरार शहर मनपाचा हा प्रभाग नालासोपारा शहराच्या पश्चिमेस आहे. प्रचंड लोकसंख्येचा हा प्रभाग असून यामध्ये मुस्लिम समाजाचे चांगले प्राबल्य आहे

सफाई, वैद्यकीय सेवेची ऐशी-तैशी
वसई : वसई विरार शहर मनपाचा हा प्रभाग नालासोपारा शहराच्या पश्चिमेस आहे. प्रचंड लोकसंख्येचा हा प्रभाग असून यामध्ये मुस्लिम समाजाचे चांगले प्राबल्य आहे. लोकसंख्या वाढीमुळे नागरी सुविधा पुरेशा प्रमाणात मिळू शकत नाहीत. रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न प्रलंबित राहिल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या प्रभागातून माजी उपमहापौर सगीर डांगे निवडून आले आहेत. त्यांना उपमहापौरपदाची अचानक लॉटरी लागली. अडीच वर्षांच्या त्यांच्या कार्यकालात त्यानी रस्ते, गटारे इ. विकासक कामे केली. परंतु रस्ता रुंदीकरणाचे महत्वाचे काम मात्र मार्गी लागू शकले नाही.
या प्रभागामध्ये पाण्याचा प्रश्न अधिक बिकट बनला आहे. ऐन उन्हाळ््यात या प्रभागातील रहिवाशांना एक दिवसाआड पाणी मिळते. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येत असतो. नालासोपारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेल्हार धरणाची पातळी उन्हाळ््यात अत्यंत खाली जात असल्यामुळे मनपा प्रशासनाला पाण्याचे नियोजन करून वितरण करावे लागते. त्यामुळे रहिवाशांना टॅँकर व बोअरिंगचा पर्याय स्वीकारावा लागतो. या प्रभागालगत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सेवा सुधारण्यासंदर्भात गेल्या साडेचार वर्षात कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. मनपा क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्याप महानगरपालिकेकडे हस्तांतरीत न झाल्यामुळे मनपा या केंद्राच्या सुधारणेसाठी आर्थिक निधी वापरू शकत नाही. ही केंद्रे तसेच प्राथमिक शाळा मनपाकडे हस्तांतरीत करण्याच्या कामांना गती मिळणे आवश्यक आहे. प्रभागामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग पहावयास मिळतात. दैनंदिन साफसफाईकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
तसेच पावसाळ््यात परिसर पाण्याखाली जात असतो त्यामुळे प्रभागामध्ये भूमिगत गटाराची कामे लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. पावसाळ््या पूर्वी ही कामे पूर्ण झाल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकेल.