यांत्रिकी झाडू करणार रस्त्यांची सफाई, स्वच्छता अभियानात क्रमवारी घसरल्यानंतर आली जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:53 AM2018-02-06T01:53:43+5:302018-02-06T01:53:59+5:30

केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानात मुंबईची क्रमवारी घसरल्यानंतर, महापालिकेला खडबडून जागी आली आहे.

Cleanliness of the mechanical broom, cleaning of the cleanliness campaign came after the fall of the order | यांत्रिकी झाडू करणार रस्त्यांची सफाई, स्वच्छता अभियानात क्रमवारी घसरल्यानंतर आली जाग

यांत्रिकी झाडू करणार रस्त्यांची सफाई, स्वच्छता अभियानात क्रमवारी घसरल्यानंतर आली जाग

Next

मुंबई : केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानात मुंबईची क्रमवारी घसरल्यानंतर, महापालिकेला खडबडून जागी आली आहे. परिणामी, भविष्यात केवळ वरचा क्रमांकच मिळविण्यासाठी नाही, तर सर्वसाधारणपणे मुंबई शहराला सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात भरघोस रकमेची तरतूद करण्यात आली आहे. विशेषत: ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाबाबत महापालिकेने एक पाऊल पुढे टाकले असतानाच, स्वच्छ उपक्रमांतर्गत या वर्षी यांत्रिकी झाडूद्वारे २०० किलोमीटर रस्त्यांची साफसफाई करण्यात येणार आहे.
सध्या यांत्रिकी झाडूद्वारे एकूण २४६.६१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची साफसफाई करण्यात येत आहे. या कामाचे जीपीएस आणि वाहन मागोवा व्यवस्थापन प्रणालीवरील अभिलेखावरून दरदिवशी संनियंत्रण करण्यात येते. परिणामकारक संनियंत्रणामुळे या रस्त्यावरील स्वच्छतेच्या स्तरामध्ये चांगला फरक पडल्याचा दावा महापालिकेला गेला आहे. विशेषत: २०१८-१९ मध्ये आणखी २०० किलोमीटर रस्त्यांची अशा
प्रकारे साफसफाई करण्यात येणार आहे.
३३.५ किलोमीटर लांबीच्या समुद्र किनाºयाची सर्वसमावेशक साफसफाई करण्यात येत आहे. स्थानिकांच्या सूचनेनुसार जुहू आणि वर्सोवा समुद्र किनाºयावरील कचरा सफाईकरिता, पावसाळ्यात अतिरिक्त मनुष्यबळ आणि मशिन वापरण्याबाबतच्या तरतुदी करून नवीन कंत्राटे देण्यात येत असून, समुद्र किनाºयांची साफसफाई यंत्राद्वारे करण्यावर आता भर देण्यात येणार आहे.
कचरा संकलन आणि वाहतूक करण्यासाठीच्या नवीन एम.एस.डब्ल्यू कंत्राटामध्ये प्रथमच सुका कचरा आणि ई-कचºयाकरिता स्वतंत्र व्यवस्था असलेले आणि काहींमध्ये बाजूंनी कचरा उचलण्याची सुविधा असलेले कॉम्पॅक्टर प्रस्तावित केले आहेत.
गृहसंस्था स्तरावर कचºयाच्या वर्गीकरणासाठी पुढील ३ वर्षांसाठी १० लीटर क्षमतेचे अंदाजे १२ लाख कचºयाचे डबे खरेदी करण्यात येत आहेत. गृहनिर्माण संस्था स्तरावर कचरा वर्गीकरणासाठी पुढील २ वर्षांसाठी १२०/२४० लीटर क्षमतेचे अंदाजे ६० हजार कचºयाचे डबे खरेदी करण्यात येत आहेत.
अस्ताव्यस्त पडलेल्या कचºयामुळे अनारोग्यदायी परिस्थिती निर्माण होत असल्याने, त्याला आळा घालण्याकरिता २०१८-१९ मध्ये कचºयाच्या डब्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. २७.८९ कोटी इतक्या खर्चाने सार्वजनिक ठिकाणी ओला आणि सुक्या कचºयाच्या १ हजार ५०० कचºयाच्या जोड डब्यांची उभारणी करण्यात येत आहे. या वर्षी प्रेक्षणीय स्थळे, पुरातन क्षेत्र आणि वर्दळीच्या ठिकाणी आधुनिक कचरापेट्या (स्मार्ट बीन्स) बसविण्यात येणार आहेत.
>कचºयापासून ऊर्जानिर्मिती
देवनारमध्ये कचºयापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. ६०० मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेच्या कचºयापासून ऊर्जानिर्मितीचा हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
या प्रकल्पाला यश मिळाल्यानंतर तितक्याच क्षमतेचे आणखी २ प्रकल्प उभारले जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या निविदेचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच निविदा मागविण्यात येणार आहेत. यासाठी ११० कोटी खर्च करण्यात येणार आहे.
मुलुंड डम्पिंग येथील जमीन पुनर्प्राप्त करण्यासाठी पुनर्निविदा मागविण्यात आल्या आहेत. हे काम २०१८-१९ मध्ये सुरू होईल. यामुळे डम्पिंगची २४ हेक्टर जमीन पुनर्प्राप्त होईल आणि अंदाजे ७ दशलक्ष मेट्रिक टन कचºयावर बायोमायनिंग प्रक्रिया करणे शक्य होईल. याकरिता ६५ कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.
विकास आराखडा २०३४ अंतर्गत राखीव ठेवण्यात आलेल्या २६ नव्या जागांचा कचºयाचे वर्गीकरण आणि त्यावर प्रक्रिया करण्याकरिता, विकेंद्रित सुविधा पुरविण्यासाठी विकास करण्यात येत आहे. सुक्या कचºयाच्या संकलनाकरिता नेमण्यात आलेल्या विशेष गाड्यांची संख्या ४७ वरून ९४ करण्यात आली आहे.

Web Title: Cleanliness of the mechanical broom, cleaning of the cleanliness campaign came after the fall of the order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.