स्वच्छता अभियानाने घडवला इतिहास
By Admin | Updated: October 2, 2014 22:51 IST2014-10-02T22:51:46+5:302014-10-02T22:51:46+5:30
जयंती दिनी, महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार करण्याकरिता देशभरात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.

स्वच्छता अभियानाने घडवला इतिहास
>अलिबाग : महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या 2 ऑक्टोबर या जयंती दिनी, महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार करण्याकरिता देशभरात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यास रायगड जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शालेय विद्यार्थी, शिक्षक, युवक, प्राध्यापक, प्राचार्य आणि डॉक्टर्स यांनी अभियानात सहभाग नोंदवला.
कुरुळ येथील सुधागड एज्युकेशन सोसायटी व सृजन विद्यालयाच्या 15क् विद्याथ्र्यानी गुरुवारी सकाळी शाळेच्या भोवतालच्या परिसरातील कचरा गोळा केला. शाळेचा परिसर स्वच्छ केल्यावर विद्याथ्र्यानी कुरुळ गावांतील ग्रामस्थांच्या घरी जावून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले शिवाय आपापला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील 14 शिक्षक देखील या मोहिमेत सहभागी झाले होते.
पाली-सुधागडमधील जे. एन. पालीवाला कॉलेजचे तब्बल 7क्क् युवक-युवती स्वच्छता मोहिमेकरिता कॉलेज व परिसरात सकाळी सक्रीय झाले आणि पाली ग्रामस्थांना ते चित्र पहाताना धक्काच बसला. महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज मोहिते यांनी प्रथम झाडू हाती घेतला आणि कचरा काढण्यास प्रारंभ केला आणि मग महाविद्यालयाच्या 7क्क् युवाफौजेने सारा परिसरच ताब्यात घेवून हा हा म्हणताना एकदम चकाचक करुन टाकला. विद्याथ्र्याच्या या स्वच्छता मोहिमेत उपप्राचार्य प्रा.सुधीर पुराणिक यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील 19 प्राध्यापक आणि 15 शिक्षकेतर कर्मचारी देखील या मोहिमेत सक्रीय सहभागी झाले होते.
डॉक्टरांनी केली किनारा स्वच्छ
सातत्याने आरोग्याची काळजी घेणारे आणि सुआरोग्याचा सल्ला आपल्या रुग्णांना देणारे इंडियन मेडिकल असोसिएशन या संघटनेशी संलग्न अलिबाग शहरातील डॉक्टरांनी संघटनेचे अध्यक्ष डॉ.किरण नाबर यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग समुद्र किनारा स्वच्छ करण्यासाठी हाती झाडू घेतला, आणि किना:याचा परिसर स्वच्छ केला. संघटनेच्या वतीने किना:यावर दोन फायबरच्या कचराकुंडय़ा ठेवून, त्यात कचरा टाकण्याचे आवाहन पर्यटकांना केले.
महाडच्या भूमी अभिलेख कर्मचा:यांकडून स्वच्छता
च्महाड : केंद्र शासनाच्या राष्ट्र्रीय स्वच्छता अभियान अंतर्गत जयंतीचे औचित्य साधून महाडच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचा:यांनी परिसरात स्वच्छता केली.
च्यावेळी सकाळी प्रथम कार्यालयात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला उपअधीक्षक भूमी अभिलेख महाडचे किरण कांगणो यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन सर्व कर्मचा:यांनी मी स्वत: घाण करणार नाही आणि दुस:यालाही करु देणार नाही. सर्वप्रथम की स्वत:पासून माङया कुटुंबापासून, माङया गल्ली,वस्तीपासून, माङया गावापासून तसेच माङया कार्यालयापासून या कामास सुरुवात करेन, अशी शपथ घेतली.
च्याप्रसंगी कार्यालय प्रमुख किरण कांगणो यांनी स्वत: झाडू हातात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद जाधव, दिलीप बोटे, रवींद्र सालावकर, गणोश डोंगरे या कर्मचा:यांनी सहभाग घेतला.
1मुरुड-जंजिरा : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद अलिबाग व पंचायत समिती मुरुड यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ऑक्टोबर गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
2सदरील कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे कर्मचारी, शिक्षण विभागीय कर्मचारी, संग्राम कक्षातील सर्व ग्रामपंचायतीने डाटा इंट्री ऑपरेटर या सर्वानी पंचायत समितीच्या आवारातील पालापाचोळा उचलून हा परिसर स्वच्छ केला. कार्यक्रमाची सुरुवात गटविकास अधिकारी संदीप जठार यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
3या कार्यक्रमात सर्व उपस्थितांनी उत्स्फूर्तपणो पंचायत समितीचा आवार स्वच्छ करुन ख:या अर्थाने निर्मल भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली.
विद्याथ्र्यानी केली परिसराची स्वच्छता
च्रेवदंडा : स. रा. तेंडुलकर हायस्कूल व. वि. म. चिपळूणकर उच्च माध्यमिक विद्यालयात विद्याथ्र्यानी आज गावातील काही परिसर स्वच्छ केला. केंद्र सरकारने सुरू केलेल्या मिशन स्वच्छ भारत, अभियानांतर्गत गाव स्वच्छ, सुंदर क रण्यासाठी परिसर स्वच्छता मोहीम राबविली.
च्प्राचार्य गजानन पाटील यांनी विद्याथ्र्याना स्वच्छतेचे महत्त्व यासंदर्भात मार्गदर्शन केले. रेवदंडा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी पोलीस कर्मचा:यांसह स्वच्छता अभियानाची शपथ घेतली.
च्अलिबाग : येथील रायगड जिल्हा रु ग्णालय यांच्या वतीने गांधी जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय स्वच्छता मोहिमे अंतर्गत रु ग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी यांनी रुग्णालयाच्या परिसराची स्वच्छता केली.
च्या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अरु ण गवळी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एस.जी.बडगीरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.जी.टी. शिंदे, रक्त संक्र मण अधिकारी डॉ. दीपक गोसावी, यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर्स,परिचारिका व कर्मचारी वर्गाने स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली.
च्या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अरु ण गवळी यांनी उपस्थितांना मतदानाचा हक्क बजावावा व निर्भयपणो मतदान करावे असे आवाहन केले. मतदान हे श्रेष्ठदान असून त्यासाठी सर्वानी सक्रियपणो सहभाग घ्यावा.
च्अलिबाग : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना शपथ दिली.
च्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सतिश बागल, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.)किरण पाणुबडे, उप जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी विश्वनाथ वेटकोळी, जिल्हा पुरवठा अधिकारी लिलाधर दुफारे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व तहसीलदार, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
च्रायगड जिल्हा परिषदेतही स्वच्छता शपथ : रायगड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद वाडेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. साळुंखे, कृषी अधिकारी बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेतील शिक्षण,आरोग्य, ग्रामपंचायत, बांधकाम आदि विभागातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
च्पेण येथील प्रांत कार्यालयात उपविभागीय अधिकारी निधी चौधरी, म्हसळा तहसीलदार कार्यालयात तहसीलदार वीरसिंग वसावे, माणगाव तहसील कार्यालयात तहसीलदार महेश सागर, पाली तहसील कार्यालयात तहसीलदार व्ही.के.रौंदळ, तर रोहा तहसील कार्यालयात तहसीलदार श्रीमती उर्मिला पाटील त्याप्रमाणो अलिबाग उपविभागीय कार्यालयात प्रांत दीपक क्षीरसागर, रोहा उपविभागीय कार्यालयात प्रांत सुभाष भागडे, पनवेल तहसील कार्यालयात तहसीलदार पवनकुमार चांडक, तहसील कार्यालयात तहसीलदार गजानन बारी यांनी कर्मचारीवर्गाला स्वच्छतेची शपथ दिली.
पनवेलमध्ये स्वच्छतेचे अभियान
च्पनवेल : गांधी जयंतीनिमित्त पनवेलमध्ये अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले होते. या निमित्ताने शासकीय अधिका:यांनी हातात झाडू घेऊन आपला परिसर स्वच्छ केला. त्याचबरोबर सामाजिक संस्था आणि संघटनांनीही साफसफाई केली.
च्पनवेल ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. लोहार यांनी स्वत: हातात झाडू घेऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणा:या ग्रामीण रुग्णालयाची साफसफाई केली. त्यांच्यासमवेत सर्व कर्मचा:यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. एमटीएनएलच्या इमारतीत अधिका:यांनी स्वच्छता अभियान राबवले.
च्त्याचबरोबर महसूल व इतर शासकीय कार्यालयातही गांधीगिरी करण्यात आली. या व्यतिरिक्त मल्याळम समाजाच्यावतीने बसस्थानकाची साफसफाई करण्यात आली. डॉ. प्रभाकर पटवर्धन रुग्णालयातील कर्मचा:यांनी आंबेडकर मार्गावरील कचरा साफ केला.