महात्मा गांधी जयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 17:07 IST2021-10-02T17:06:28+5:302021-10-02T17:07:00+5:30
मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या पुढाकारातून शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते

महात्मा गांधी जयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात स्वच्छता मोहीम
मुंबई - सामाजिक दृष्टिकोन लक्षात घेता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान व आजूबाजूच्या पारिसरात मनसेच्या वतीने स्वछता मोहीम राबविण्यात आली. त्यास स्थानिक नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला.
मनसेचे माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या पुढाकारातून शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यात 125 मनसेचे कार्यकर्ते तसेच नागरिक सहभागी झाले होते. स्वच्छतेचे दूत समजले जाणारे महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन आरोग्याच्या दृष्टिकोनातून हाती घेण्यात आलेल्या स्वछता मोहिमेत दोन लॉरी कचरा उचलण्यात आला.
महात्मा गांधीजींचे कार्य अलौकिक आहे देशासाठी त्यांचे योगदान देखील फार मोलाचे आहे त्यांचे हे कार्य असेच पुढे सुरु राहावे यासाठी आजच्या त्यांच्या जयंती दिनी स्वछता मोहिमेचे आयोजन केले असल्याचे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.