स्वच्छता निरीक्षकाकडे 29 लाख
By Admin | Updated: November 2, 2014 01:13 IST2014-11-02T01:13:23+5:302014-11-02T01:13:23+5:30
मुंबई महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाच्या फ्लॅटमध्ये तब्बल 29 लाख 18 हजार 7क्क् रुपयांची रोकड मिळाली आहे.

स्वच्छता निरीक्षकाकडे 29 लाख
मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाच्या फ्लॅटमध्ये तब्बल 29 लाख 18 हजार 7क्क् रुपयांची रोकड मिळाली आहे. 5क्क्, 1क्क्क् रुपयांच्या नोटांची बंडले त्याने बेडरुम व दिवाणखान्यातील कपाट, ड्रॉवरमध्ये भरुन ठेवली होती. मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
किशोर हरी नाईक (5क्) असे या संशयित अधिका:याचे नाव असून त्याचे व नातेवाईकांच्या नावे विविध बॅँकेतील खाती, स्थावर, जंगम मालमत्तेचा आकडा कोटीहून अधिक आहे. त्याबाबतचा तपशील मिळविण्यात येत असल्याचे अधिका:यांनी सांगितले. नाईक हा पालिकेच्या अंधेरीतील के पश्चिम विभागीय कार्यालयात आहे. या परिसरात एका नागरिकाने कॉफी शॉप सुरु केले आहे. त्यासाठी आरोग्य परवाना मिळण्यासाठी या व्यावसायिकाच्यावतीने सल्लागार कंपनीच्या प्रतिनिधीने नाईक याच्याशी संपर्क साधला होता. त्याने त्यासाठी 6क् हजार देण्याची मागणी केली. फिर्यादीने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अधिका:यांनी रचलेल्या सापळ्यानुसार, 5क् हजार रुपये दिल्यास परवाना देण्याची किशोर नाईकने कबुली दिली. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन शनिवारी माटुंगा परिसरातील
त्याच्या फ्लॅटची झडती घेण्यात आली. (प्रतिनिधी)