केईएममध्ये सफाईला सुरुवात
By Admin | Updated: October 29, 2014 00:56 IST2014-10-29T00:56:01+5:302014-10-29T00:56:01+5:30
डेंग्यूला आळा घालण्यासाठी महापालिका रुग्णालये सज्ज आहेत, असा दावा महापालिकेकडून सातत्याने करण्यात येतो.

केईएममध्ये सफाईला सुरुवात
कोल्हापूर : तब्बल हजारांहून मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताला आमंत्रण देणारा, शरीराची हाडं मोडकळीस आणणारा अन् धुळीचे साम्राज्य निर्माण करून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारा अशी ओळख आता पापाची तिकटी ते रंकाळा टॉवर या रस्त्याची होऊ लागली आहे. महापालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. एकंदरीत ‘रस्ता दाखवा, बक्षीस मिळवा’, अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
४पाच प्रभागांत अडकला रस्ता...
पापाची तिकटी-रंकाळा टॉवर हा रस्ता बाजारगेट, महालक्ष्मी मंदिर, तटाकडील तालीम, दुधाळी व चंद्रेश्वर या पाच प्रभागांत येत असल्यामुळे या रस्त्यासाठी निधी कोणी द्यावयाचा, यावरून गेली पाच वर्षे या रस्त्याला डांबर लागलेले नाही. केवळ पावसाळ्यापूर्वी या संपूर्ण रस्त्याचे पॅचवर्क केले जाते. परंतु, पावसाळ्यातच हे पॅचवर्क धुऊन जाते. मग, पुन्हा ‘येरे माझ्या...’ या म्हणीप्रमाणे अवस्था होते.
४कोकणकडे जाणारा रस्ता...
कोकणकडे जाण्यासाठी हा रस्ताच मुख्य असल्याने या रस्त्यावरून रोज हजारो वाहनांची ये-जा होते. परंतु, वाहनचालकांना अशा चार बाय चारच्या मोठ्या खड्ड्यांतूनच कसरत करत जावे लागते.
४वाहनचालकांना लागतो किमान २०-२५ मिनिटे वेळ...
पापाची तिकटीकडून रंकाळा टॉवरकडे जाण्यासाठी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांना किमान २० ते २५ मिनिटे लागतात. त्यामुळे वाहनचालक वैतागत आहे.
४रंकाळा टॉवरच्या रस्त्यावर लावले झाड...
रंकाळा टॉवरच्या रस्त्यावर असलेल्या ड्रेनेज सिमेंटच्या झाकणावर मोठे भगदाड पडले आहे. रोज सकाळी रंकाळ्यावर फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी या भगदाडामध्ये झाड लावून त्यावर पुष्पहार घालून महापालिका प्रशासनाचा अशा प्रकारे निषेध केला आहे.
४रंकाळा बसस्थानक ते टॉवरसाठी ४० लाखांची तरतूद
संबंधित ठेकेदाराने पूर्वीचा रस्ता केला असेल अन् तो खराब झाला तर त्याने प्राधान्याने प्रथम तो रस्ता केला पाहिजे. त्यानंतरच त्याला नवीन रस्त्याचे टेंडर दिले जाईल, असे प्रशासनाने सांगितले. रंकाळा बसस्थानक ते रंकाळा टॉवर जाऊळाचा गणेश मंदिर या रस्त्यासाठी ४० लाख रुपये निधीची तरतूद महापालिकेने केली आहे. (प्रतिनिधी)
ठेकेदार व प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे हा रस्ता झालेला नाही. त्यासाठी लवकरच गंगावेश चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. हा प्रश्न सुटला नाही तर पुढील काळात या प्रश्नासाठी उपोषण करू
- सचिन बिरंजे, सामाजिक कार्यकर्ते
परतीचा पाऊस संपल्यानंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात करू. महापालिकेच्या निधीतून हा नवीन रस्ता करण्यात येईल
- नेत्रदीप सरनोबत,
शहर अभियंता, महापालिका.
दहा ते १२ वर्षे हा रस्ता असाच पडून आहे. याचा व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. तसेच धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे लवकर नवीन रस्ता व्हावा.
- किरण गायकवाड,
व्यापारी (गंगावेश)